---Advertisement---

केकेआर संघासाठी बॅटिंग ऑर्डर बनली मोठी समस्या, श्रेयस अय्यर करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी?

On: रविवार, मार्च 20, 2022 12:29 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. २०२२ च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरची कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. त्यापूर्वी त्याने आपल्या योजनेबद्दल सांगितले आहे. त्याला लिलावात केकेआरने १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यापूर्वी तो दिल्ली संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

श्रेयस म्हणाला की, संघ व्यवस्थापनासोबत त्याने कित्येकदा फलंदाजीच्या क्रमाबाबत चर्चा केली होती. त्याला याबद्दल कोणीही काही माहिती दिली नाही की, या हंगामात कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळेल आणि व्यंकटेश अय्यर कोठे असेल.

संघाचा कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फ्रॅंचायझीच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, “मी जेव्हा केकेआर संघाविरुद्ध खेळलो आहे, तेव्हा हा संघ व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल दिसला आहे. पहिल्या चेंडूपासूनच ते इतर संघांना बॅकफूटवर ठेवतात. तुम्हाला अशी मानसिकता ठेवण्याची गरज आहे आणि एक फलंदाज म्हणून माझी सुद्धा अशीच मानसिकता आहे. एक कर्णधार म्हणून मला संघाकडून हीच अपेक्षा आहे. मला वाटते की, आम्ही तेथे जावे आणि जेवढा जमेल असा स्वाभाविक खेळ खेळावा. जर आम्ही सहज बाद झालो, तर जास्त पश्चाताप होत नाही. तुम्ही जे काही करता, ते संघासाठी करता आणि स्वत:ला मागे ठेवता.”

मागील हंगामात केकेआरकडून सलामीसाठी व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल हे दोन खेळाडू आले होते. व्यंकटेशने १० सामन्यांमध्ये ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा केल्या होत्या. या हंगामात ऍलेक्स हेल्स संघातून बाहेर गेल्यामुळे व्यंकटेशसोबत सलामीला अजिंक्य रहाणे येऊ शकतो. याबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, “त्यांच्या फलंदाजी क्रमाबाबत आम्ही अजून काही ठरवले नाही, परंतु मला वाटते की, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाशी याबद्दल बोलायला हवे.”

पुढे बोलताना केकेआरचा कर्णधार म्हणाला, “मी भारतासाठी खेळताना व्यंकटेशसोबत याबाबत बोललो होतो, तर तो आम्ही निवडेल त्या स्थानावर खेळण्यास तयार आहे. त्याने केकेआरसाठी वरच्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे, मी त्याला मैदानात पाहिले आहे. जेव्हा मी त्याला विचारले की, आपण एक संघ बनून कसे खेळले पाहिजे, तर तो नेहमी सकारात्मक गोष्टी बोलत असतो आणि जिंकण्याचा विचार करत असतो.”

श्रेयस भारतीय संघात फलंदाजीसाठी पाचव्या क्रमांकावर येतो. आता केकेआरसाठी तो त्याच्या आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तो म्हणाला, “तुम्ही मूळ रुपात स्वत:ला एका कामासाठी तयार करू शकत नाही. हे बदलू शकते. एक दिवस मी पाॅवर हिटर बनू शकतो, तर दुसऱ्या दिवशी मी डाव सांभाळण्याचे काम करू शकतो. आपल्या भूमिका परिस्थितीनुसार बदलत असतात. तुम्ही डाव सांभाळण्यासाठी विशेष खेळाडूवर विश्वास दाखवू शकत नाही.”

“मूळ रुपात संघातील सर्व खेळाडूंची जबाबदारी घ्यायची असते. मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आवडते आणि मला वाटते की, हे माझ्यासाठी योग्य आहे. मी तिसऱ्या क्रमांकावर खूप काळापासून फलंदाजी करत आहे. मी लवचीक आहे, मी माझ्या संघासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे.”

आयपीएल २०२२चा पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडने चक्क ‘नंबर वन’ गोलंदाजाला महत्त्वाच्या मालिकेतून वगळले, मग गोलंदाजानेही व्यक्त केला ‘हा’ मानस

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वचषक खेळणारा तमिम इक्बाल, ज्याने क्रिकेटविश्वात बांगलादेशला मिळवून दिले मानाचे स्थान

पंजाब किंग्ज ठरणार नवीन आयपीएल चॅम्पियन? संघाचा नवा कर्णधार मयंक अगरवाल म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---