आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पंजाब किंग्जने सर्वात कमी खेळाडू (2), तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक खेळाडू (6-6) संघात कायम राखले आहेत. तर आगामी लिलावापूर्वी, काही फ्रँचायझींनी त्यांच्या संबंधित कर्णधारांना सोडण्याचा धाडसी निर्णयही घेतला आहे. या यादीत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. या संघांनी आपापल्या कर्णधारांनारिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
गतविजेत्या केकेआरने कर्णधार श्रेयसला सोडले
फ्रँचायझीने जाहीर केलेल्या कर्णधारांच्या यादीत सर्वात मोठे नाव श्रेयस अय्यरचे आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)ने गेल्या मोसमात विजेतेपद पटकावले होते. केकेआरने श्रेयस अय्यरला सोडण्याचा निर्णय घेतला. केकेआरने 6 खेळाडूंना कायम ठेवले असले तरी श्रेयसचे नाव त्यात नाही.
रिषभ पंतची नऊ वर्षांची साथ हुकली
दिल्ली कॅपिटल्सनेही स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंत 9 वर्षे दिल्ली संघात राहिला. गेल्या मोसमात खुद्द पंतने दुखापतीतून प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत संघाचे नेतृत्व केले होते. त्याने 13 सामने खेळले, ज्यात त्याने 446 धावा केल्या होत्या.
राहुल तीन वर्षे लखनऊचा भाग राहिला
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला आयपीएल मेगा लिलावापूर्वी सोडण्यात आले आहे. केएल राहुल लखनऊस्थित या फ्रँचायझीसोबत तीन वर्षे राहिला. लखनऊचा संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली 3 हंगामात दोनदा आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचला होता.
फाफ डू प्लेसिस
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी हंगामापूर्वी फाफ डू प्लेसिसला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डू प्लेसिसने संघाची कमान सांभाळली होती.
सॅम करन/शिखर धवन
पंजाब किंग्सने सर्वात कमी खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबनेही आपल्या कर्णधाराला कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही. सॅम करन आणि शिखर धवन यांनी गेल्या मोसमात संघाचे नेतृत्व केले होते पण यावेळी पंजाब नव्या कर्णधारासह मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
हेही वाचा –
कधीकाळी सर्वाधिक फी घेणाऱ्या धोनीला सीएसकेने फक्त ‘इतक्या’ कोटींना केले रिटेन
कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?
आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा