---Advertisement---

RR vs KKR: हंगामातील पहिल्या विजयासाठी कोलकात्यासमोर 152 धावांचे लक्ष्य!

---Advertisement---

RR vs KKR IPL 2025: आयपीएल 2025 मधील सहावा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आ णि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर आहेत. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरायण हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी मोईन अलीला संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे, राजस्थानने फजलहक फारुकीच्या जागी वनिंदू हसरंगाचा समावेश केला आहे. 18व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात आरआर आणि केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला.

पहिल्या डावात खेळताना राजस्थान राॅयल्सने मर्यादित 20 षटकात 9 विकेट गमावून 151 धावा केल्या, चांगली सुरुवात होऊनही संघाला मोठी धावासंख्या उभारता आली नाही. कारण केकेआर संघाने ठरावीक अंतरावर सातत्याने विकेट्स घेतल्या, राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 33 धावा केल्या, त्याच्याशिवाय कर्णधार रियान पराग (25 धावा) व यशस्वी जयस्वाल (29 धावा) केल्या. आखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरच्या 16 धावांच्या जोरावर संघ 150+ धावांपर्यंत पोहोचला.

गोलंदाजीत केकेआरकडून वैभव आरोरा वरुण चक्रवर्ती हर्षित राणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. केकेआरला हंगामातील पहिल्या विजयासाठी 152 धावांची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---