कोलकाता | बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईने कोलकाताचा तब्बल १०२ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने उभ्या केलेल्या २१० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव १०८ धावांवरच संपुष्टात आला.
या सामन्यात मुंबईकडून इशान किशनने ६२, सुर्याकुमार यादवने ३६, रोहित शर्माने ३६ तर बेन कटिंगने २४ धावा केल्या. कोलकाताकडून कोणत्याही फलंदाजाला विशेष चमक दाखवता आली नाही.
हा कोलकाताचा या मोसमातील ११ सामन्यातील ६वा पराभव ठरला. तर गेले तीन दिवसांत मुंबईने या संघाला दोन वेळा पराभूत केले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या ८ सामन्यात मुंबईने कोलकाताला एकही सामना जिंकू दिले नाही.
आजपर्यंत या दोन संघात २३ सामने झाले असुन त्यातील तब्बल १८ सामने मुंबईने जिंकले आहेत तर केवळ ५ सामन्यात कोलकात्याला विजय मिळवता आला आहे.
२००८-२०१० या काळात या दोन संघात ६ सामने झाले. हे सर्व सामने मुंबईने जिंकले. त्यानंतर २०११-२०१५ या दोन संघात १० सामने झाले. यातील ५ सामने मुंबईने तर ५ कोलकाताने जिंकले. त्यानंतर २०१६ ते २०१८ या काळात झालेल्या ७ पैकी ७ सामन्यात मुंबईने कोलकाताला धुळ चारली आहे.
एकाच संघाविरुद्ध सलग ८ सामने पराभुत होणारी कोलकाता ही आयपीएलमधील तिसरी टीम ठरली आहे. विशेष म्हणजे याच कोलकाता संघाने किंग्ज ११ पंजाबला सलग ८ सामन्यात पराभुत केले होते. यामुळे एखाद्या संघाकडून ८ सामन्यात पराभुत होणारा तसेच एखाद्या संघाला सलग ८ सामन्यात पराभुत करणारा कोलकाता पहिलाच संघ ठरला आहे.
गेल्या ८ सामन्यात मुंबईने एकदाही कोलकाताला विजय मिळवुन दिला नाही. आयपीएलमध्ये मुंबई आणि कोलकाता हे दोन संघ दिग्गज संघ मानले जातात,
त्या दोन संघातील सामनेही प्रेक्षक मोठ्या आवडीने पहातात. अशा या दोन संघातील सामन्यात मुंबईने कोलकाताला एकदाही जिंकुन दिले नाही ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.
या विजयामुळे मुंबई गुणतालिकेत ४थ्या स्थानावर आली असुन कोलकाता पाचव्या स्थानावर फेकले गेले आहे.
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित शर्मा आणि इडन गार्डनचे नाते काही खास!
-एका सामन्यासाठी का बदलणार राजस्थान राॅयल्स जर्सीचा रंग?
–टी२०मध्ये कोहलीपेक्षा एबी डिव्हिलियर्सच भारी, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
-गोलंदाज असुनही टी२०मध्ये त्याने सर्व क्रमांकावर फलंदाजी केलीय!