---Advertisement---

‘वेल डन बॉइज,’ कोलकाता संघाची हैदराबादविरुद्ध विजयी सेंच्यूरी; संघमालकाने केलं तोंडभरुन कौतुक

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 2:24 PM
---Advertisement---

आयपीएल लीग मधील 14 व्या सत्रातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) रविवार (11 एप्रिल) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले. आयपीएलमधील केकेआरचा हा 100 वा विजय होता. या सामन्यानंतर केकेआर संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ट्वीट करत आपल्या संघाचे अभिनंदन केले.

शाहरुखने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आयपीएलमधील 100 वा विजय झाला. हे आमच्यासाठी चांगले आहे.” खूप छान मुलांनो. खरेतर, तुम्ही सर्वच जण खूप चांगले खेळलात.”

https://twitter.com/iamsrk/status/1381301821256261636?s=20

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने नितीश राणाच्या दमदार खेळीच्या जोरावर 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हैदराबाद संघ केवळ 177 धावा करू शकला. केकेआकडून नितीश राणाने सर्वाधिक 56 चेंडूत 80 धावांचे योगदान दिले. याशिवाय शुभमन गिलने 15, राहुल त्रिपाठीने 53 तर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 22 धावा केल्या.

त्याचबरोबर हैदराबादकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नबी आणि रशीद खानने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि नटराजन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

त्यानंतर लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाने आपला कर्णधार डेविड वॉर्नर (3) आणि वृद्धिमान साहा (7) हे दोन बळी स्वस्तात गमावले. त्यानंतर मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टोने यादोघांनीही आपली अर्धशतके झळकावली. परंतु केकेआरच्या गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट घेतल्यामुळे हैदराबाद संघाला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आपल्या वाणीने लाखो आयपीएलप्रेमींना घायाळ करणारी ‘ती’ यंदाही गेली कुठे? चाहत्यांनी काढली आठवण

‘माझ्यासाठी आयपीएल म्हणजेच…,’ आंद्रे रसेलच्या त्या विधानाने जिंकली कोट्यावधी भारतीयांची मने

मुंबई इंडियन्सला गवसला कोहिनूर! धाकट्या भावानंतर थोरल्याला दिली जागा, ‘अशी’ राहिलीय त्याची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---