---Advertisement---

केकेआरच्या ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, मायदेशी झाला रवाना

On: मंगळवार, मे 18, 2021 7:10 PM
---Advertisement---

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला कोरोना विषाणूचा जोरदार फटका बसला होता. अर्धा हंगाम पार पडला असताना काही संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आला होता. या पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू टीम सिफर्ट याचाही समावेश होता.

मात्र आता त्याच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम सिफर्टचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला मायदेशी देखील परतता आले नव्हते. मात्र आता कोरोनातून पूर्ण बरा झाल्याने मायदेशी म्हणजेच न्यूझीलंडला जाण्यासाठी तो रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.

न्यूझीलंडच्या एका क्रीडा संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. त्यांनी म्हंटले आहे की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिफर्टने मायदेशी परतण्यासाठी भारतातून उड्डाण घेतले आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी या वृत्ताचे स्वागत केले आहे. “सिफर्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येणे, ही एक चांगली बातमी असून लवकरच तो मायदेशात येईल. माझे त्याच्याशी याबाबत बोलणे देखील झाले आहे. आमच्यासाठी त्याची प्रकृती उत्तम आहे, ही अतिशय सकारात्मक बातमी आहे”, अशी प्रतिक्रिया गॅरी स्टेड यांनी दिली.

भारत सोडण्यापूर्वी केलेल्या चाचणीचा अहवाल आला होता पॉझिटिव्ह
भारत सोडण्यापूर्वी टीम सिफर्टची पीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत सिफर्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आयपीएल रद्द झाले तरी देखील त्याला इतर क्रिकेटपटूंसोबत चार्टर्ड विमानात न्यूझीलंडला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्याला अहमदाबाद येथे विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र आता चौदा दिवसांनतर केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला.

या हंगामासाठी त्याला केकेआरच्या संघाने मूळ किमतीला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. मात्र इतर मातब्बर परदेशी खेळाडू संघात असल्याने त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय महिला संघ १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात खेळणार कसोटी सामना? पाहा आत्तापर्यंतची दोन्ही संघांची आकडेवारी

महत्त्वाची बातमी! यूके आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंना मिळणार लसीचा दुसरा डोस

ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---