---Advertisement---

आयपीएलच्या चमकदार कामगिरीनं केकेआरचं ‘हे’ खेळाडू झाले मालामाल!

On: सोमवार, मे 27, 2024 6:36 AM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 च्या ट्राॅफीवर त्यांचं नाव कोरलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं फायनल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआर संघ अनेक खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने थक्क झाला. केकेआरनं सामना जिंकला. आणि खेळाडूंना लाखो रुपयांसह अनेक बक्षीसं मिळाली. त्यामुळे आता कोणते बक्षीस कोणत्या खेळाडूला मिळालं, हे या बातमीद्वारे जाणून घेऊ. 

मिचेल स्टार्कपासून रहमानउल्ला गुरबाजपर्यंत अनेक खेळाडूंनी केकेआरसाठी चमकदार कामगिरी केली. स्टार्क ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. तर गुरबाजनं सर्वाधिक चौकार मारून ‘ऑन द गो फोर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार पटकावला.

सर्वाधिक स्ट्राईक रेटनं धावा केल्याबद्दल व्यंकटेश अय्यरला ‘स्ट्रायकर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला. व्यंकटेशला बक्षीस म्हणून एक लाख रुपये मिळालं. याशिवाय व्यंकटेश अय्यरला सर्वाधिक षटकार मारल्याबद्दल ‘सुपर सिक्स ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला. ज्यामध्ये त्याला ट्रॉफी आणि एक लाख रुपये मिळाल.

अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी दोन पुरस्कार मिळालं. ज्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘अल्टीमेट फँटसी प्लेयर’ यांचा समावेश होता. स्टार्कला ट्रॉफी आणि प्लेअर ऑफ द मॅचसाठी 5 लाख रुपयांच बक्षीस मिळालं. आणि वेगवान गोलंदाजाला 1 लाख रुपये आणि ‘अल्टीमेट फॅन्टसी प्लेयरसाठी’ ट्रॉफी मिळाली.

कोलकाताचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज याला ‘ऑन द गो, फोर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला. ज्यामध्ये त्याला ट्रॉफीसह 1 लाख रुपयांच मानधन मिळालं मिळालं. कोलकाताचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज हर्षित राणाला ‘ग्रीन डॉट बॉल ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळाला. हर्षितनं सर्वाधिक 13 निर्धाव चेंडू फेकले. ज्यासाठी त्याला 1 लाख रुपये आणि एक रोप मिळाले.

महत्वाच्या बातम्या-

सुनील नारायण IPL 2024 चा सर्वात मौल्यवान खेळाडू! तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकून रचला इतिहास

आयपीएलमध्ये विराट कोहलीचा धमाका, ऑरेंज कॅप जिंकून रचला इतिहास, तर ‘हा’ खेळाडू ठरला पर्पल कॅपचा मानकरी

फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची 5 मोठी कारणं, पॅट कमिन्सचा संघ ट्रॉफी जिंकण्यात कुठे चुकला

 



 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---