---Advertisement---

नितीश राणाच्या पत्नीला त्रास देणाऱ्या 2 तरुणांना त्यांच्याच घरातून अटक, काय झालेलं वाचाच

On: शनिवार, मे 6, 2023 7:05 PM
Nitish-Rana-And-Saachi-Marwah
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची धुरा नितीश राणा याच्या खांद्यावर आहे. आयपीएलमध्ये व्यस्त असताना नितीश राणाची पत्नी साची मारवाह हिच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. साची मारवाह हिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुवारी (दि. 4 मे) साची छतरपूरहून तिच्या घरी मॉडेल टाऊनला जात होती, तेव्हाच कीर्ती नगरच्या एका सिग्नलवर दुचाकीवर आलेले दोन युवक तिच्या कारच्या पुढे येऊन थांबले. कीर्ती नगरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साची मारवाह (Saachi Marwah) हिने ई-मेलच्या माध्यमातून तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी (दि. 6 मे) दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दोन तरुणांना घरातून अटक
साची मारवाह हिच्या तक्रारीनुसार, दोन युवकांनी तिच्या गाडीचा कीर्ती नगरच्या एका सिग्नलपर्यंत पाठलाग केला. साचीसोबत तिच्या कारच्या ड्रायव्हरही होता. त्या दोघांनी त्यांची दुचाकी गाडीच्या पुढे उभी केली आणि टक्कर मारली. साचीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन तरुणांची ओळख पटवली. त्यातील एकाचे नाव चैतन्य शिवम आहे, जो दिल्लीच्या पांडव नगर येथे राहतो. तसेच, दुसऱ्याचे नाव विवेक आहे. विवेक हा पटेल नगर येथे राहतो. या दोघांचे वय 18 वर्षे आहे. पोलिसांनी चैतन्य आणि विवेकला त्यांच्या घरातून अटक केली. तसेच, पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलेलं?
खरं तर, यापूर्वी साचीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवरही याची माहिती दिली होती. तसेच, सांगितले होते की, कशाप्रकारे दोन तरुणांनी दुचाकीवरून तिच्या गाडीचा पाठलाग केला आणि टक्करही मारली. या संपूर्ण घटनेनंतर साचीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मात्र, तक्रार करण्यासाठी पोहोचलेल्या साचीसोबत पोलिसांची वागणूक खूपच वाईट होती. साचीच्या इंस्टा स्टोरीनुसार, पोलिसांनी तिला म्हटले की, तुम्ही सुखरुप घरी पोहोचला आहात. विसरून जावा. यानंतर पोलिसांनी तिला सल्ला दिला की, नंतर असे काही घडले, तर गाडीचा नंबर नोंदवून घ्या. साचीने इंस्टाग्राम स्टोरीवर घडला प्रकार सांगितल्यानंतर सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

 

साची मारवाह आणि नितीश राणा यांनी 2019मध्ये संसार थाटला होता. विशेष म्हणजे, साची ही दिग्गज अभिनेता गोविंदाची पुतणी आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची चुलत बहीण आहे. (kkr skipper nitish rana wife Saachi Marwah car who rammed police arrested two boys)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बेबी मलिंगा’समोर खोऱ्याने धावा काढणाऱ्या वढेराने टाकल्या नांग्या, खतरनाक यॉर्करने ‘अशा’ उडवल्या दांड्या
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात या तिघांपैकी एक घेणार केएल राहुलची जागा! जाणून घ्या त्यांच्याविषयी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---