भारतीय संघाला आयपीएल 2023 संपल्यानंतर जुन महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी अंतिम सामना खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना 7 ते 11 जुनदरम्यान लंडनच्या के ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. पण त्याआधीच केएल राहुल याच्या दुखापतीची बातमी समोर आली. राहुल आयपीएल 2023सह डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. अशात या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला राहुलचा पर्यायी खेळाडू हवा आहे. संघासमोर सध्या तीन सर्वोत्तम पर्याय आहेत.
केएल राहुल (KL Rahul ) मागच्या मोठ्या कळापासून फॉर्ममध्ये नव्हता. पण त्याचा आनुभव पाहता जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात महत्वाची भूमिका तो पार पाडू शकत होता. पण आयपीएलदरम्यान राहुलला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला संपूर्ण हंगमातून माघार घ्यावी लागली. तसेच शुक्रवार (5 मे) राहुल डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातही खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली. या बातमीनंतर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात राहुलची जागा कोण भरणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयने सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना आधीच या सामन्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात केएल राहुलची जागा भरण्यासाटी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचेही नाव चर्चेत आहे. असे मानले जात आहे की, सरफराज, ईशान आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील एकाला प्रत्यक्ष डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळवले जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार सूर्यकुमारला इंग्लंडचा विजा तयार ठेवायला सांगितले गेले आहे. सूर्यकुमारच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. या सामन्यातही त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली होती. असे असले तरी, सूर्यकुमार मैदानात काय करू शकतो, हे प्रत्येकाला माहिती आहे.
सरफराज खान (Sarfraz Khan) देशांतर्गत क्रिकेटमधील मागच्या काही हंगामात धमाकेदार प्रदर्शन करत आहे. अशात मागच्या मोठ्या काळापासून त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या चर्चाही होत आहेत. पण डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात्या त्याला थेट संधी मिळणे कठीणच दिसते. दुसरीकडे ईशान किशन (Ishan Kishan) याला देखील अजून कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. ईशान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही जास्त काही करू शकला नाहीये. पण त्याच्या कसोटी पदार्पणाच्या चर्चा देखील मागच्या मोठ्या काळापासून सुरू आहेत. (One of these three will replace KL Rahul in the final match of WTC! )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पथिरानाच्या वेगापुढे मुंबईने 139 धावांवर टेकले गुडघे, चेन्नई करणार का यशस्वी पाठलाग?
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! IPLमध्ये रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, स्वप्नातही म्हणेल ‘नकोच’