बुधवारी (६ एप्रिल) आयपीएल २०२२चा १४वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. केकेआरने ५ विकट्स राखून यामध्ये विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसची चर्चा झाली. २०२२च्या सुरुवातीला पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत ब्रेविसने दक्षिण आफ्रिका संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले. अखेर आयपीएलमध्ये मुंबईने त्याला केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी दिली.
आयपीएल पदार्पणाच्या या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) याने १९ चेंडूत २९ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि २ षटकार निघाले. त्याचा स्ट्राईक रेट १५२ धावांपेक्षा जास्त होता. वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करून तंबूत पाठवण्याचे काम केले. ब्रेविसच्या एका षटकाराची खास चर्चा होत आहे, ज्यामध्ये शॉट खेळल्यानंतर तो काही वेळ चेंडूकडे पाहत नाही. चाहते या षटकाराला ‘नो लूक सिक्स’ म्हणत आहेत. त्याच्या या शॉटमध्ये चेंडू मैदानाबाहेर जाणूनच पडणार असल्याचा, असा आत्मविश्वास दिसतो.
“So, it’s like drugs?”
“It’s better than drugs, Jeremy”#NoLookShot #DewaldBrevis #IPL2022 #KKRvMI pic.twitter.com/Cx8eDUX1OS— Home of Cricket Memes (@TheCric8Addict) April 6, 2022
ब्रेविसने १९ वर्षाखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये अप्रतिम प्रदर्शन करत वैयक्तिक ५०६ धावा साकारल्या होत्या. यादरम्यान त्याने दोन शतके केली आणि दोन वेळा नर्व्हस नाइंटीजवर बाद झाला. विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिका संघासाठी १३८, ६, ९७, ९६, १०४, ६५ असे प्रदर्शन केले. शिखर धवनने २००४ साली भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून विश्वचषक खेळताना विक्रमी ५०५ धावा केल्या होत्या. ब्रेविसने धनवचा हा विक्रमही मोडीत काढला.
https://twitter.com/mohitherapy/status/1511718818217103361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511718818217103361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fipl-2022%2Fipl-2022-kkr-vs-mi-dewald-brevis-no-look-six-reminds-fans-of-ab-de-villiers-watch-2868938
आयपीएल मेगा लिलावात अनेक युवा खेळाडूंना संघांनी कोट्यावधी रुपयांमध्ये खरेदी केले. विश्वविजेत्या भारताच्या १९ वर्षाखालील संघातील खेळाडूंनाही बऱ्यापैकी पैसा मिळाला. परंतु दक्षिण अफ्रिकेच्या युवा ब्रेविससाठी संघांमध्ये झुंबड उडाली. ब्रेविसला खरेदी करण्यासाठी अनेक संघ इच्छुक होते, पण अखेर मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपये खर्च करून त्याला संघात सामील केले. १९ वर्षाखालील विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंपैकी ब्रेविस सर्वात महागडा खेळाडू ठरला. आता आयपीएलच्या चालू हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
MI vs KKR | ‘ती’ एक ओव्हर मुंबईचे फॅन्स आणि डॅनियल सॅम्स आयुष्यभर नाही विसरणार
‘माही भाई नाही, तर मग काय’, उथप्पाच्या पेचावर धोनीनेच दिलं उत्तर; मैत्रीचाही खास किस्सा झाला उघड
‘ही वेळ अर्जुन तेंडुलकरला संघात आणण्याची’, मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी