---Advertisement---

सतत फ्लॉप ठरणारा राहुल पत्नीसोबत महाकालेश्वराच्या चरणी! तिसऱ्या कसोटीत मिळणार का संधी?

KL Rahul Athiya Shetty
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सद्या धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतही राहुलची बॅट शांत होती. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताला विजय मिळला असला, तरी राहुलची बॅठ या दोन्ही सामन्यात शांत होती. खराब फॉर्मचा सामना करत असलेला राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होलकर स्टेडियमवर सुरू होईल. बीसीसीआयने रविवारी (19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात एक मोठी बदल पाहायला मिलाला. केएल राहुल चो मागच्या मोठ्या काळापासून भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होता, त्याला आता या जबाबदारीतून मुक्त केले गेले. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत राहुलला केवळ एक खेळाडू म्हणून भारतीय संघात सामील केले गेले.

संघाचे उपकर्णधारपद गमावल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर () मंदीरात पोहोचले. याठिकाणी राहुल आणि अथिया महाकालेश्वराचा अभिषेक करताना दिसले. सोशल मीडियावर राहुल आणि अथियाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर चाहते आणि इतर नेटकऱ्यांच्या वेगवेगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1629733792570286080?s=20

खराब फॉर्मधील केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यासठी संघाचा उपकर्णधार तर नसेल, पण त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान देखील निश्चित नाहीये. प्लेइंग इलेव्हनमधून राहुलच्या जागी शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सूर्यकुमार यादव देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची वाट पाहत आहे. चांगल्या फॉर्ममधील खेळाडू बेंचवर असताना राहुलला मिळणाऱ्या सततच्या संधीमुळे संघ व्यवस्थापनावर देखील मागच्या काही महिन्यात अनेकदा टीका झाल्या आहेत.

दरम्यान, याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये राहुलच्या बॅटमधून 33.44 च्या सरासरीने 2642 धावा निघाल्या. यात 7 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे फॉरमॅटमध्ये राहुलने 51 सामन्यात 44.52च्या सरासरीने 1870 धावा केल्या आहेत. तसेच भारतासाठी खेळलेल्या 72 टी-20 सामन्यांमध्ये राहुलने 2265 धावा कुटल्या आहेत, यादरम्यान त्याची सरासरी 37.75 राहिली. वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये राहुलच्या नावापुढे अनुक्रमे 5 आणि 2 शतकांची नोंद आहे. (KL Rahul and Athiya Shetty reached Mahakaleshwar for darshan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे
मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळला खेळाडू, उपचारापूर्वीच निधन, सहकाऱ्यांना धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---