भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली होती. या मालिकेत भारतीय संघासाठी केएल राहुल आणि रिषभ पंत या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अशातच आता येणाऱ्या वनडे मालिकांमध्ये विराट कोहली समोर मोठे धर्मसंकट निर्माण झाले आहे.
भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी, टी२० आणि वनडे मालिकेमध्ये विजय मिळवला होता. परंतु या विजयानंतर विराट कोहलीच्या चिंतेत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासुन रिषभ पंतने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे तर दुसरीकडे केएल राहुलने देखील वनडे मालिकेत शतकी खेळी करत जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये या दोघांपैकी कोणाला संघात स्थान द्यायचे हा प्रश्न विराट कोहली समोर उपस्थित झाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ पंत याला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याने या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
त्यानंतर त्याने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टी२० आणि वनडे मालिकेत स्थान देण्यात आले होते. यात त्याने चौफेर फटकेबाजी केली होती. तर दुसरीकडे इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या केएल राहुलने वनडे मालिकेत दमदार पुनरागमन करत शतक झळकावले होते.
आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली कोणत्या खेळाडूला संधी देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लग्नानंतर नववधूला घरी सोडून बुमराहची आयपीएल वारी, मुंबई इंडियन्सच्या गोटात दाखल; पाहा फोटो
सोन्यासारखी संधी! विराट, शिखरसह ‘हे’ खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात करु शकतात मोठे विश्वविक्रम
केकेआरच्या ‘या’ खेळाडूला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा; माजी विश्वविजेत्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा