दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुल (kl rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी (south africa vs india odi series) विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि रोहित शर्माला ही जबाबदारी दिली गेली. परंतु, दुखापतीमुळे रोहित या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलला ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागणार आहे. एकदिवसीय मालिकेतील राहुलचे नेतृत्व पाहून कसोटी संघाच्या कर्णधारपदाविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो.
एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले. विराटनंतर बीसीसीआय कसोटी संघासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे आणि केएल राहुलचे नाव या पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. पण प्रश्न असा आहे की, राहुल कसोटी संघाचा कर्णधार बनण्यासाठी खरोखर सक्षम आहे का ?
२९ वर्षीय केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व करण्याचा जास्त काही अनुभव नाही. त्याने आयपीएलमध्ये मागच्या दोन हंगामात पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. त्याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पाडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने कर्णधाराची भूमिका पार पाडली. विराट कोहली दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला आणि राहुलने त्याची जबाबदारी पार पाडली होती. या सामन्यांशिवाय राहुलकडे कर्णधारपदाचा कसलाच अनुभव नाही.
अशात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याला मिळालेली नेतृत्वाची संधी त्याच्यासाठी महत्वाची असणार आहे. या मालिकेत राहुल कसल्याही अनुभवाशिवाय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने एकाही लिस्ट ए सामन्यात संघाचे नेतृत्व केले नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याने नेतृत्व केलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे. या सामन्यात कर्णधार म्हणून राहुल खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकला नाही.
आयपीएलमधील त्याचा इतिहास पाहिला, तर तो खूपच साधारण दिसतो. आयपीएल २०२० आणि २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघ गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर राहिला. या दोन्ही हंगामात संघाने प्रत्येकी सहा सामन्यात विजय मिळवला, तर आठ सामन्यात पराभव पत्करला. त्याचे हे आकडे पाहता समजते की, कर्णधाराच्या रूपात राहुलने निराशाजनक प्रदर्शन केले आहे. अशात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत, जर त्याने भारताला विजय मिळवून दिला, तर कसोटी कर्णधारपदासाठी तो दावेदारी भक्कम करेल. परंतु या मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला, तर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दुसऱ्या एखाद्या खेळाडूचा विचार देखील होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
९० गुणांच्या सामन्यात युपीची पलटनवर सरशी! मात्र, युवा अस्लम-मोहितने जिंकली मने
गांगुली-शहा जोडी होणार बीसीसीआयमधून पायउतार? महत्त्वाच्या कारणाचा झाला खुलासा
“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहा –