ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताला एकतर्फी पराभव स्वीकारावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली आणि तो मर्यादित षटकांच्या मालिकांमधून बाहेर पडला. त्यानंतर, भारताचा उपकर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषदेत वॉर्नरच्या दुखापतीवर केलेले वक्तव्य अनेकांना आवडले नाही. राहुलच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला गेला.
वॉर्नर मर्यादित षटकांच्या मालिकांमधून बाहेर
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यातून आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉर्नर दुसर्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या जागी डार्सी शॉर्टचा टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. वॉर्नरने भारताविरुद्धच्या त्या पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
वॉर्नर बाहेर जाणे आमच्या फायद्याचे
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्नरच्या दुखापतीविषयी विचारले असता, राहुल विनोदाने म्हणाला, “वॉर्नर किती काळ संघाबाहेर राहणार हे मला माहीत नाही. मात्र, तो जितका वेळ बाहेर असेल, ते भारतीय संघासाठी फायद्याचे ठरेल.”
मात्र, राहुलचे हे वक्तव्य क्रिकेट चाहत्यांना पसंत पडले नाही. राहुलच्या या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. अनेकांनी राहुलच्या खिलाडूवृत्तीवर शंका उपस्थित केली.
काँग्रेस नेत्याने राहुलच्या खिलाडूवृत्तीवर घेतली शंका
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य अहराझ मुल्ला यांनी ट्विट करून म्हटले, ‘खेळभावना कोठे गेली? वॉर्नर जखमी झाला तरी, तुला फक्त विजयच हवा आहे.’
Where is the sportsmanship gone? So you expect winning for yeam India only if Warner gets injured? @klrahul11 https://t.co/r9GpXOj3E4
— ahraz mulla (@AhrazMulla) November 30, 2020
चाहत्यांनी धरले राहुलला धारेवर
एका चाहत्याने ट्वीट करत म्हटले, ‘राहुल एक खेळाडू आहे आणि त्याला वाटतेय वॉर्नरने दुखापतग्रस्त राहावे. एका खेळाडूची हीच का खेळभावना?
दुसऱ्या एका चाहत्याने ट्विटरवर म्हटले, ‘एक खेळाडू म्हणून राहुलने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हे बोलायला नव्हते पाहिजे. मी भारतीय आहे आणि तरीही वॉर्नरने खेळावे अशी माझी इच्छा आहे. आमच्या संघाने वॉर्नरचा समावेश असलेल्या संघाला पराभूत करावे.”
वॉर्नरने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात कर्णधार ऍरॉन फिंचसोबत अनुक्रमे १५६ व १४२ धावांची सलामी भागीदारी केली. या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत