---Advertisement---

Video: खुद्द कर्णधारानेच केली निराशा! राहुलने झेल सोडताच जल्लोष करत असलेल्या गंभीरने धरलं डोक

On: गुरूवार, मे 26, 2022 2:06 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपरजायंट्सने १४ धावांनी गमावला. लखनऊ संघाच्या या पराभवासाठी त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण जबाबदार ठरले. लखनऊ संघाने बेंगलोरच्या फलंदाजांचे ४ झेल सोडले. यातील एक झेल स्वत लखनऊचा कर्णधार केएल राहुल यानेही सोडला होता, ज्यानंतर संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

या सामन्यात बेंगलोरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. बेंगलोर संघाला ११५ धावांवर ४ धक्के बसले होते. अशात दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने डावाखेर २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्यान एकदा त्याला जीवनदानही मिळाले.

बेंगलोरच्या डावातील पंधराव्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. मोहसिन खानच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर कार्तिकने (Dinesh karthik) ऑन साईडला जोराचा फटका मारला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुलने वेगाने पळत जात चेंडू टिपण्यासाठी डाईव्ह मारली. त्यामुळे त्याला पाहून डगआऊटमधून सामना पाहात असलेल्या मार्गदर्शक गंभीरने टाळ्या वाजवत जल्लोष साजरा करायला सुरुवात केला. परंतु तो चेंडू त्याच्या हातून निसटला (KL Rahul Dropped Catch)आणि कार्तिकला जीवनदान मिळाले. हे पाहून जल्लोष साजरा करत असलेल्या गंभीरची (Gautam Gambhir Reaction)निराशा झाली आणि त्याने डोके धरले. 

https://twitter.com/Smash_Jaiswal/status/1529495724391636993?s=20&t=LfGm95hVJDQyud5Ao2PwzA

या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसेच लखनऊला पराभूत होताना पाहून गंभीरचे तोंड पडले होते. यावेळचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

दरम्यान लखनऊने हा महत्त्वपूर्ण सामना गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. लखनऊने साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामने जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. लखनऊ संघ गुजरातनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला होता. परंतु राजस्थानने नेट रन रेटच्या जोरावर गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला. परिणामी लखनऊचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी एलिमिनेटर सामना खेळावा लागला, जिथे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी फक्त एकच संधी मिळाली.

महा स्पोर्ट्सच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

नो बॉलच्या निर्णयावरून कृणाल, राहुलची पंचांशी हुज्जत, समजूत काढूनही विचारला जाब; होऊ शकते शिक्षा

कोहलीचा ‘विराट’ विक्रम, २५ धावांची छोटेखानी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाला पछाडले

अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---