वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. आक्रमक सुरुवातीला भारतीय संघाचा डाव काहीसा घसरला. मात्र, त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी शानदार संघर्ष केला. राहुलने भारतीय फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर वाहत शानदार अर्धशतकी खेळी केली.
भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अकराव्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाल्यावर राहुल मैदानावर उतरला. त्याने विराट कोहलीसह संघाचा डाव सावरत भारताला दीडशे पार नेले विराट बाद झाल्यानंतर त्याने रवींद्र जडेजा याच्यासह संघाचा डाव पुढे नेला. यादरम्यान त्याने 85 चेंडू मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. जडेजा बाद झाल्यावरही त्याने आपला संयम ढळू न देता डाव पुढे नेला.
KL Rahul dismissed for 66 runs from 107 balls.
It was a peach from Starc and ended a fighting knock from Rahul, great knock under pressure. pic.twitter.com/tk8etjfQqM
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
तो अखेरपर्यंत खेळून भारताला मोठी धावसंख्या गाठून देईल असे वाटत असताना त्याने 107 चेंडूंमध्ये 66 धावांची झुंजार खेळी केली. यामध्ये केवळ एका चौकाराचा समावेश होता.
राहुल या विश्वचषकात अगदी पहिल्या सामन्यापासून आपल्या शानदार खेळाने सर्वांचे मन जिंकले. पहिल्याच सामन्यात त्याने 97 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने या संपूर्ण विश्वचषकात 91 पेक्षा जास्तच्या सरासरीने केवळ दहा डावांमध्ये 443 धावा केल्या. यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 400 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
(KL Rahul Hits Most Runs On Number 5 in ODI World Cup History)
हेही वाचा-
World Cup Final: आक्रमक सुरुवातीनंतर रोहित अन् श्रेयस लागोपाठ तंबूत, विराट मैदानात उभा
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का