पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात बुधवारपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे झाला. या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) भारतीय कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमही झाला आहे.
केएल राहुल नवा कर्णधार
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून दूर करण्यात आले होते. त्यामुळे, त्याच्याऐवजी वनडे संघाचा रोहित शर्माला नियमित कर्णधार आणि केएल राहुलला नियमित उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येण्यापूर्वी रोहित दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केएल राहुलकडे भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले. तसेच जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले.
त्यामुळे बुधवारी केएल राहुल भारताचा २६ वा वनडे कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला होता. यापूर्वी भारताचे २५ खेळाडूंनी नेतृत्त्व केले आहे.
विशेष म्हणजे केएल राहुलने यापूर्वी एकदाही अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये नेतृत्त्व केले नव्हते. त्यामुळे अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एकदाही नेतृत्त्व न करता वनडेत भारताचे कर्णधारपद सांभाळणारा केएल राहुल तिसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी असा कारनामा सईद किरमानी आणि विरेंद्र सेहवागने केला होता.
भारताकडून वनडेत नेतृत्त्व करणारे खेळाडू
१. अजित वाडेकर – २ सामने (१९७४-१९७४)
२. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन – ७ सामने (१९७५-१९७९)
३. बिशन सिंग बेदी – ४ सामने (१९७६-१९७८)
४. सुनील गावसकर – ३७ सामने (१९८०-१९८५)
५. गुंडप्पा विश्वनाथ – १ सामने (१९८१-१९८१)
६. कपिल देव – ७४ सामने (१९८२-१९८७)
७. सईद किरमानी- १ सामना (१९८३-१९८३)
८. मोहम्मद अमरनाथ – १ सामना (१९८४-१९८४)
९. रवी शास्त्री – ११ सामने (१९८७-१९९१)
१०. दिलीप वेंगसरकर – १८ सामने (१९८७-१९८९)
११. कृष्णम्मचारी श्रीकांत – १३ सामने (१९८९-१९८९)
१२. मोहम्मद अझरुद्दीन – १७४ सामने (१९९०-१९९९)
१३. सचिन तेंडुलकर – ७३ सामने (१९९६-२०००)
१४. अजय जडेजा – १३ सामने (१९९८-१९९९)
१५. सौरव गांगुली – १४६ सामने (१९९९-२००५)
१६. राहुल द्रविड – ७९ सामने (२०००-२००७)
१७. अनिल कुंबळे – १ सामना (२००२-२००२)
१८. विरेंद्र सेहवाग – १२ सामने (२००३-२०१२)
१९. एमएस धोनी – २०० सामने (२००७-२०१८)
२०. सुरेश रैना – १२ सामने (२०१०-२०१४)
२१. गौतम गंभीर – ६ सामने (२०१०-२०११)
२२. विराट कोहली – ९५ सामने (२०१३-२०२१)
२३. अजिंक्य रहाणे – ३ सामने (२०१५-२०१५)
२४. रोहित शर्मा – १० सामने (२०१७-२०१९)
२५. शिखर धवन – २१ सामने (२०२१-२०२१)
२६. केएल राहुल – १ सामना (२०२२-२०२२)
महत्त्वाच्या बातम्या –
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर
“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी