---Advertisement---

जबरदस्त! जिममध्ये घाम घाळतोय केएल राहुल; व्हिडिओत पाहायला मिळाली कमबॅकची तयारी

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 8:12 PM
KL-Rahul
---Advertisement---

भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या फिटनेसच्या समस्येशी झगडत आहे. याच कारणास्तव तो श्रीलंकेविरुद्धच्या सध्या खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेसाठी संघासोबत उपस्थित नाहीये. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेतही तो उपस्थित नव्हता. असे असले, तरीही राहुलच्या चाहत्यांसाठी एक चांगला संकेत मिळाला आहे. राहुलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत आहे.

फिटनेसच्या कारणास्तव विश्रांतीवर असलेला राहुल लवकरच संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. अशातच त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुलने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “क्लोजर.” त्याला या कॅप्शनमधून असे सूचित करायचे असू शकते की, तो पूर्णपणे फिट होण्यासाठी किंवा संघात पुनरागमन करण्यापासून तो थोडाच दूर आहे. व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---