क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते हे काही नवीन नाही. अनुष्का-विराट, हार्दिक-नताशा, युवराज-हेजल, हरभज- गीता हे त्याची काही उदाहरणे आहेत. आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे नाव जोडले जाणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची खूप चर्चा झाली. मात्र यासंदर्भात राहुल, अथिया किंवा इतर जवळक्या व्यक्तींकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. परंतु केएल राहुलने आता अधिकृतरित्या ही गोष्ट मान्य केली आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे प्रेम प्रकरण सुरू
केएल राहुल सध्या इंग्लंडमध्ये आहे. येत्या काही दिवसात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासुन सुरू होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यासाठी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि पत्नीला घेऊन जाण्याची अनुमती दिली आहे. अशात बातमी समोर येत आहे की, अथिया शेट्टी देखील इंग्लंडला गेली आहे. (Kl rahul listed bollywood actress Athiya shetty as his partner)
राहुलने मान्य केले अथिया आहे त्याची पार्टनर
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, लॉजिस्टिक विभागात सादर केलेल्या कागदपत्रात केएल राहुलने अथिया शेट्टीला आपली पार्टनर म्हणून घोषित केले आहे. अथिया साऊथम्प्टनमध्ये केएल राहुलसोबत होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “दोघेही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सोबत इंग्लंडला गेले होते. रवाना होण्यापूर्वी लॉजिस्टिक्स विभागाने सर्व खेळाडूंना त्या सदस्यांची नावे विचारली होती, जे खेळाडूंसोबत इंग्लंडला रवाना होणार होते. त्यावेळी केएल राहुलने अथिया शेट्टीचे नाव पार्टनर म्हणून दिले होते.”
गेल्या काही दिवसांपूर्वी केएल राहुल, अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीसोबत रस्त्यावर फिरताना दिसून आला होता. त्यांचे फोटोही राहुलने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावरून चाहत्यांना खात्री पटली होती की, अथिया शेट्टी केएल राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्रिकेटचा देव’ आता विराजमान होणार खऱ्याखुऱ्या मंदिरात, सर्वात मोठ्या चाहत्याने सुरू केली तयारी
ख्रिस गेलनंतर ‘हा’ भारतीय असेल पुढील १४ हजारी मनसबदार, माजी क्रिकेटरचा दावा
स्म्रीतीचे अर्धशतक व्यर्थ, तिसऱ्या टी२०त इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय; भारताने गमावली सलग चौथी मालिका