इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यात बाचाबाची झाली होती. या दोघांमध्ये नक्की काय घडले होते, याचा खुलासा केएल राहुलने सामना झाल्यानंतर केला आहे.
या सामन्यातील पहिल्या दिवसापासून जेम्स अँडरसन आणि जसप्रीत बुमराह या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली होती. हे सर्व शेवटच्या दिवसांपर्यंत सुरू होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी(१६ ऑगस्ट) जेव्हा जसप्रीत बुमराह फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी इंग्लिश गोलंदाजांनी त्याचे स्वागत बाऊन्सर चेंडूने केले होते. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मार्क वूड यांच्यात देखील बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत केएल राहुलने खुलासा करत म्हटले की, “जर व्यक्तिगतरित्या म्हणायचं झालं तर, मैदानावर स्पष्टपणे दिसून येत होते की, दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळत आहेत. तसेच प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठीच खेळत असतो. जर कोणी आम्हाला काही म्हटलं, तर एक संघ म्हणून प्रत्युत्तर द्यायला आम्ही मागे पुढे पाहत नाही. जर कोणी आमच्या एका खेळाडूला काही म्हटले तर ते एका खेळाडूसाठी मर्यादित नसते. ते आम्हा सर्वांना लागू होते.”(Kl rahul open what happened between jasprit bumrah and James Anderson in lords test)
तसेच राहुलने पुढे म्हटले की,”आम्हाला माहीत होते की, लंच नंतर डाव घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे गोलंदाज देखील गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक होते. त्या सर्वांना माहीत होते की,१० ते १२ षटक गोलंदाजी करायची आहे.” या सामन्यात भारतीय संघाने २९८ धावा करत डाव घोषित केला होता. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती. परंतु यजमानांना अवघ्या १२० धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन
भारताविरुद्ध लढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; ‘या’ दोन दिग्गज गोलंदाजांची मालिकांमधून माघार
‘या’ कारणासाठी बीसीसीआय मानतेय चाहत्यांचे आभार