अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत ४ सामन्यांनंतर २-२ अशी बरोबरी झाली आहे. असे असले तरी या मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलला सातत्याने अपयश आल्याचे दिसले आहे. त्याने या मालिकेत खेळलेल्या ४ सामन्यात केवळ १५ धावा केल्या आहेत. तर शेवटच्या ५ टी२० सामन्यात तो ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. परंतु भारतीय कर्णधाराने त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामागचे कारण केएल राहुलचे टी२० मधील आकडे असू शकतात.
आयपीएल २०२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० च्या हंगामात राहुलने किंग्स इलेवेन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत त्याने १४ सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये त्याने ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा केला होता. यासोबतच ऑरेंज कॅप देखील पटकावली होती म्हणजेच तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतकं झळकावली होती.
टी२० कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेत राहुल सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. परंतु त्याने खेळलेल्या मालिकेतील चारही सामन्यात त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे. या मालिकेत तो २ वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर त्याला पहिल्या सामन्यात १ धाव करण्यात आणि चौथ्या सामन्यात १४ धावा करण्यात यश आले आहे. तसेच त्याने खेळलेल्या शेवटच्या ५ आंतरराष्ट्रीय सामन्यात तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. राहुल टी२० कारकिर्दीच्या सर्वात कठीण काळातून प्रवास करत आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १४ पेक्षा अधिक वेळेस ५० पेक्षा जास्त धावा
केएल राहुलने भारतीय संघासाठी एकूण ४९ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १४२.१९ च्या स्ट्राईक रेट आणि ३९.९२ च्या सरासरीने तब्बल १५५७ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतक आणि १२ अर्धशतक झळकावले आहेत. त्याने १४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच आयसीसीच्या टी२० क्रमवारीमध्ये तो ७७१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विरेंद्र सेहवागचा खुलासा, इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘ती’ गोष्ट पाहून विराटला मिळाला फिटनेस मंत्र
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत मॉर्गन घालतोय सातत्याने दोन टोप्या, ‘हे’ आहे कारण
“तुमच्याकडे प्लॅन-बी नव्हता का?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भडकला आफ्रिदी