भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. उभय संघांतील ही वनडे मालिका 10 जानेवारी रोजी सुरू होत आहे. तत्पूर्वी खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत राहुलसह कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्रांती दिली गेली होती. विश्रांतीनंतर वनडे मालिकेत रोहित, राहुल आणि विराट संघात पुनरागमन करणार आहेत. वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुल नेट्समध्ये सराव करताना दिसला.
केएल राहुल (KL Rahul) याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून नेट्समधील हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. सराव करताना राहुलने काही अप्रतिम शॉट्स खेळल्याचेही दिसत आहेत. नेट्समध्ये राहुलचा फॉर्म पाहून चाहत्यांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. मागच्या वर्षी राहुल संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नव्हता, मात्र यावर्षी त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा सर्वांना आहेत. त्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. राहुलने व्हिडिओ कॅप्सनमध्ये लिहिले की, “राईट हिअर.” चाहते राहुलला पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळताना पाहण्यायसाठी उत्सुक आहेत.
https://www.instagram.com/reel/CnE479SPP23/?utm_source=ig_web_copy_link
राहुलचे मागच्या वर्षीचे प्रदर्शन पाहता चाहते आणि क्रिकेटच्या जाणकारांनी त्याच्यावर निशाणा साधला. दरम्यानच्या काळात त्याला दुखापत देखील झाली. दुखापतीमुळे राहुल काही महिने क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. दुखापतीनंतर संघात पुनरागमन केल्यानंतर राहुल अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने काही अर्शशतके केली आहेत, मात्र चाहत्यांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा यापेक्षा खूप जास्त आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत राहुलला लग्नासाठी सुट्टी दिली गेली आहे, अशाही चर्चा माध्यमांमध्ये होत्या. पण अजून राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्न झाल्याची कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
मागच्या वर्षातील राहुलच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये 17.12 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. 50 धावा ही या चार सामन्यांतील त्याची सर्वोत्तम खेळी होती. वनडे क्रिकेटमध्ये त्याने मागच्या वर्षी 10 सामने खेळले. या 10 सामन्यांमध्ये राहुलने 27.88 च्या सरासरीने 251 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 2 अर्धशतक केले आणि 73 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी होती. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने मागच्या 2022 मध्ये खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये राहुलने 28.93 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 6 अर्धशतक केले आणि 62 ही त्याची सर्वात मोठी खेळी राहिली. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 30 सामन्यांमध्ये 25.68 च्या सरासरीने 822 धावा केल्या, ज्यात एकूण 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक) , ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह. (KL Rahul practiced in the nets before the ODI series against Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यो-यो टेस्टच्या भीतीने कॅप्टन रोहितने बनवली लांबलचक यादी, मग जिमला बनवले डान्स फ्लोर
आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी, मुंबईत उपचार सुरू