भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज केएल राहुल हा सध्या बॉलिवूडमधील आण्णा अर्थातच सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी सोबतच्या नात्यामुळे कायमच चर्चेत असतो. अर्थातच दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अजूनही अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. सोशल माध्यमावरील त्यांच्या पोस्ट आणि कमेंटवरुन असा कयास लावला जात आहे की हे दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत.
मागील काही काळापासून दोघांचे एकत्र बरेच फोटो पाहायला मिळाले आहेत. दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच रात्री डिनर करताना दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. भारतीय संघातील खेळाडू रॉबिन उथप्पाची बायको शीतलने पण काही छायाचित्र शेअर केले होते, त्यात हे दोघेही दिसून आले होते.
आथियाने राहुलच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (१८ एप्रिल) इंस्टाग्रामवर पोस्टही केली आहे. त्या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे की, ‘ग्रेटफुल फॉर यू (तूझ्या असण्याचा आनंद आहे). वाढदिवसाच्या शुभेच्छा.” मागच्यावर्षी देखील आथियाने राहुलच्या वाढदिवसाला फोटो पोस्ट केला होता. त्यावर तिने ‘माय पर्सन’ (माझा व्यक्ती) असे लिहिले होते.
https://www.instagram.com/p/CNzH2XRnupL/
केएल राहुलचा जन्म १८ एप्रिल १९९२ ला मंगळूर मध्ये झाला होता. त्याचे नाव या आधी पण बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आकांक्षा रंजन, निधी अग्रवाल आणि सोनल चौहान यांच्यासोबत पण त्याचे नाव जोडले गेले. पण काही काळाने त्यांच्याबरोबरच्या त्याच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता त्याचे नाव आथियाबरोबर जोडले जात असून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेच या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
पण आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्यातील नात्याबाबत त्या दोघांनीही अजून तरी कबुली दिलेली नाही. आथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी आणि आई माना शेट्टी दोघांनाही राहुल आवडत असल्याचे सांगण्यात येते. एकदा मुलाखत देताना सुनील शेट्टीने सांगितले होते की, “माझी मुलगी ज्या मुलाला पसंद करेल आम्ही त्यालाच आम्ही पसंती देणार आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबाद संघात केदार जाधवला स्थान देण्याची ‘या’ माजी खेळाडूने केली मागणी
पृथ्वी शॉचा अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा षटकार, पाहा व्हिडिओ