वनडे विश्वचषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 200 धावांचे आव्हान मिळालेले. खराब सुरुवातीनंतर भारतासाठी के एल राहुल व विराट कोहली यांनी दीडशतकी भागीदारी करत भारताला विजय साकार करून दिला. या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी करणाऱ्या राहुलने सामना संपल्यावर मोठ्या घटनेचा खुलासा केला.
विजयासाठी केवळ 200 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाचे पहिले तीन फलंदाज दोन धावांमध्ये माघारी परतलेले. त्यानंतर विराट व राहुल यांनी 165 धावांची भागीदारी केले. विराटने 85 तर राहुलने नाबाद 97 धावा केल्या. आपल्या या खेळीनंतर बोलताना तो म्हणाला,
https://x.com/criccrazyjohns/status/1711056970852254071?s=46&t=8kw6H56WOVCZNCUy5Loonw
“मी नुकताच शॉवर घेऊन आलो होतो. त्यानंतर हे सर्व अतिशय वेगाने घडले. मला यष्टीरक्षण केल्यानंतर थोड्या विश्रांतीची गरज होती. मात्र, ते जमले नाही व मला मैदानात यावे लागले.”
राहुलने आपल्या या नाबाद खेळी दरम्यान 115 चेंडूंचा सामना केला. यामध्ये आठ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
भारतीय संघासमोर अशी परिस्थिती 1983 वनडे विश्वचषकावेळी देखील आली होती. झिम्बाब्वेविरूद्ध भारतीय संघाने आपले चार फलंदाज केवळ नऊ धावांवर गमावले असताना, तत्कालीन भारतीय कर्णधार कपिल देव हे देखील अशाच प्रकारे शॉवर घेऊन आल्यावर मैदानात उतरले त्यानंतर त्यांनी 175 धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय संघाने हा विश्वचषक देखील जिंकलेला.
(KL Rahul Reveal He Is Taking Bath When Top Order Failed Against Australia)
महत्वाच्या बातम्या –
भारताची जर्सी घालून मैदानात घुसणे जार्वोला पडलं महागात! विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीची मोठी कारवाई
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या वाट्याला अजून एक दुःख, आयसीसीच्या कावाईचा करावा लागणार सामना