---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यात पहिल्याच सामन्यात केएल राहुलचं शतक, रोहितच्या जागी मिळाला नवा खेळाडू!

On: शनिवार, जून 7, 2025 1:10 PM
---Advertisement---

भारताच्या अ संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात केएल राहुल सलामीवीर फलंदाज म्हणून खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलने शतक झळकावले. राहुलने हे शतक झळकावण्यासाठी 151 चेंडूंचा सामना केला. तरीही, ध्रुव जुरेलसह राहुल भारताच्या डावाला पुढे नेत आहे.

रोहित शर्माने गेल्या महिन्यात 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर, संघाच्या कर्णधारपदासोबतच, यशस्वी जयस्वालसोबत संघात कोण सलामीला येईल हा एक मोठा प्रश्नही निर्माण झाला. त्याच वेळी, केएल राहुलच्या शतकाने या प्रश्नाचे उत्तर दिले. या सामन्यात, राहुलने यशस्वीसोबत सलामीला उतरले आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकले आहे.

भारताच्या अ संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल प्रथम फलंदाजीला आले. जयस्वाल 26 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार अभिमन्यू ईश्वरन फलंदाजीला आला. अभिमन्यू 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. मागील सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या करुण नायरने 71 चेंडूत 40 धावा काढून आपली विकेट गमावली.

भारतीय संघाची धावसंख्या 57 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा झाली आहे. ध्रुव जुरेलनेही शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले आहे आणि तो 81 चेंडूत 51 धावांवर फलंदाजी करत आहे. त्याच वेळी, केएल राहुल 153 चेंडूत 102 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---