क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी (19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध 7 गडी राखून मोठा विजय मिळवला. गोलंदाजांनी बांगलादेशला रोखल्यानंतर सर्वच फलंदाजांनी योगदान देत भारताचा हा विजय साकार केला. विराट कोहली याने झळकावलेले नाबार्द शतक हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य राहिले. मात्र, त्याचे शतक पूर्ण व्हावे यासाठी के एल राहुल याने निस्वार्थपणे आपला खेळ केल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
KL Rahul said, "when 30 runs were needed, I told Virat that I'll just block, you go for shots. At the end, Virat told me he made it too close for his comfort". pic.twitter.com/8tI7orKp8H
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
भारतीय संघ हा सामना सहजरित्या जिंकेल हे भारताच्या डावाच्या मध्यातच समजून आले होते. मात्र, विराट कोहली शतक पूर्ण करणार का याकडे सर्वांची नजर होती. अखेरच्या टप्प्यात भारताला विजयासाठी 19 तसेच विराटला शतकासाठी तितक्याच धावांची गरज होती. विराटचे शतक पूर्ण व्हावे यासाठी राहुलने अनेकदा एकेरी धाव काढण्यास नकार दिला. तसेच विराट शतकाच्या जवळ जावा यासाठी त्याने चार वेळा वेगाने दुहेरी धावा काढल्या. त्याच्या या निस्वार्थपणे केलेल्या खेळाचे तसेच खेळ भावनेचा अनेक जण कौतुक करत आहेत.
या सामन्याचा विचार केल्यास बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सलामीवीरांनी 93 धावांची भागीदारी करत भारतापुढे आव्हान निर्माण केले. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत त्यांचा आढाव केवळ 256 पर्यंत मर्यादित ठेवला. त्यानंतर भारताला रोहित शर्मा व गिल यांनी 88 धावांची सलामी दिली. तर श्रेयस अय्यरने 46 धावांचे योगदान दिले. नाबाद शतकासाठी विराट कोहली याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे.
(KL Rahul Selfless Inning Praised By Netizens For Virat Kohli Century)
महत्वाच्या बातम्या –
लिटन-तंझीदने बांगलादेशसाठी केला मोठा पराक्रम, तब्बल 25 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये…
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर