नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे भारतातील क्रिकेट सध्या तरी ठप्प आहे. अशामध्ये अधिकतर क्रिकेटपटू आपापल्या घरांमध्ये कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या नावाचाही समावेश आहे.
राहुलने (KL Rahul) सोशल मीडियावर सांगितले की तो क्रिकेटला खूप मिस करत आहे. त्याने सोमवारी (१३ जुलै) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपले क्रिकेटचे साहित्य जसे की, बॅट, हेलमेट आणि ग्लोव्हज समोर बसला आहे.
२८ वर्षीय राहुलने शेअर केलेल्या फोटोत त्याने हातात आपले हेल्मेट पकडले आहे तसेच तो त्याकडे पाहताना दिसत आहे. त्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले, “आय मिस यू.” याबरोबरच त्याने सॅड इमोजीचाही समावेश केला आहे.
https://twitter.com/klrahul11/status/1282596317751996417
राहुलने यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या मालिकेत त्याने अनुक्रमे ५७*, ५६, ८८* आणि ११२ धावांची खेळी खेळली होती. आयपीएल २०२०मध्ये राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल (IPL) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
राहुलने भारतीय संघाकडून ३६ कसोटी सामने, ३२ वनडे सामने आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३४.५८ च्या सरासरीने २००६ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ४७.६५ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ४५.६५ च्या सरासरीने १४६१ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप; कष्ट गांगुुलीने केले तर धोनीला सगळं फुकटात मिळालं
-गांगुलीपेक्षा धोनी कधीही भारी, पहा कोणत्या माजी खेळाडूने केले हे भाष्य






