भारताचा दिग्गज फलंदाज केएल राहुल याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अप्रतिम खेळी केली. राहुलने या सामन्यात अर्शधतक ठोकले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडू शकला. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली. अशात अशी माहिती समोर येत आहे की, राहुल जानेवारी महिन्यात प्रेयसी अथिया शेट्टी सोबत लग्न करणार आहे आणि याच कारणास्तव त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे.
केएल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. राहुल सध्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघासोबत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गुरुवारी (12 जानेवारी) त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) खेळला गेला. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारताने मालिका नावावर केली आहे. मात्र, तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल. उभय संघांतील ही मालिका संपल्यानंतर भारताला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (13 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषित केला. राहुलला या आगामी मालिकेसाठी निवडलेल्या वनडे आणि टी-20 संघातून वगळण्यात आले आहे.
या आगामी मालिकेतून राहुलचे नाव वगळल्यानंतर बोर्डाने सांगितले की, केएल राहुल (KL Rahul) त्याच्या कौटुंबीक कारणांमुळे संघातून बाहेर असेल. माहितीनुसार येत्या 23 जानेवारी रोहीच राहुल आणि आथिया शेट्टी लग्न करणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 18 जानेवारी रोजी सुरू होणार असून मालिकेतीच शेवटचा सामना 24 जानेवारी रोजी खेळला जाईल. अशात बारतीय संघातील खेळाडू राहुलच्या लग्नात उपस्थित राहू शकणार नाहीत. पण संघा या मालिकेत न्यूझीलंडला मात देत राहुलला मोठी भेट नक्कीच देऊ शकतो. मुंबईतमध्ये या दोघांचा विवाह पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नावेळी भारतीय संघ मात्र तिसऱ्या वनडे सामन्यासाठी इंदोरमध्ये असेल.
असे असले तरी, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली विश्रांतीवर आहेत. अशात भारताचे हे दोन्ही दिग्गज फलंदाज राहुलच्या लग्नासाठी उपस्थित राहू शकतात. माजी कर्णधार एमएस धोनी आणि मयंक अगरवाल हेदेखील लग्नासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कोसीट सामन्यांची मालिका खेळली जाणार असून मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल. राहुलला या मालिकेत संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी दिली गेली आहे. (KL Rahul will miss the ODI and T20I series against New Zealand to marry Athiya Shetty)
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ व मुकेश कुमार.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
त्रिशतक आले कामी! टीम इंडियात निवड होताच पृथ्वी शॉने शेअर केली इंस्टाग्राम स्टोरी
चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास