क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित युवा कबड्डी सिरीजचा आज अंतिम दिवस आहे. आज सकाळी दुसरा समान तिसऱ्या क्रमांकासाठी झाला. नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध कोल्हापूर ताडोबा टायगर्स यांच्यात सामना झाला. दोन्ही संघाच्या मध्ये युवा कबड्डी सिरीज मध्ये एक सामना झालेला त्यात कोल्हापूर संघाने बाजी मारली होती. सामन्याच्या सुरुवातीला कोल्हापूर संघाने आघाडी घेतली होती. 0-4 अश्या पिछाडी नंतर नांदेड संघाच्या अजित चव्हाण ने चपळ चढाया करत गुण मिळवत सामना 8-8 असा बरोबरीत आणला. त्यानंतर कोल्हापूर च्या तेजस पाटील ने गुण मिळवत संघाल पुन्हा आघाडी मिळवून दिली.
मध्यांतरा आधी कोल्हापूर संघाने नांदेड संघाल ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 21-16 अशी आघाडी होती. कोल्हापूर कडून तेजस पाटील तर नांदेड कडून अजित चव्हाण ने चांगला खेळ केला. कोल्हापूर संघाच्या तेजस पाटील ने सुपर टेन सह 12 वा गुण मिळवत चढाईत 200 गुण मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला. तर दादासो पुजारी ने हाय फाय करत संघाला निर्यायक आघाडी मिळवून दिली. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना 35-19 अशी कोल्हापूर संघाकडे आघाडी होती.
कोल्हापूर संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामना 43-26 असा जिंकत तिसरा क्रमांक पटकावला. कोल्हापूर संघाकडून तेजस पाटील ने 15 गुण मिळवले. तर दादासो पुजारी ने पकडीत 7 गुण मिळवत आपल्या संघाला तिसरा क्रमांक पटकावून दिला. नांदेड कडून अजित चव्हाण ने 13 गुण मिळवले तर अभिषेक बोरगोडे ने पकडीत 4 गुण मिळवले. कोल्हापूर संघाने तिसऱ्या क्रमांकाचे 5,00,000 रुपयांचे तर नांदेड संघाने चौथ्या क्रमांकाचे 2,00,000 रुपयांचे पारितोषिक जिंकले. (KMP Youth Kabaddi Series – Kolhapur Tadoba Tigers team became the third runner-up.)
बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- दादासो पूजारी, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
कबड्डी का कमाल- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेपॉकवर चेन्नई पुन्हा चीत! अखेरच्या चेंडूवर पंजाबने पार केले 201 धावांचे आव्हान
के.एम.पी युवा कबड्डी सिरीज – ठाणे हम्पी हिरोज संघ ठरला पाचव्या क्रमांकाचा मानकरी