क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित युवा कबड्डी सिरीजचा आज अंतिम दिवस आहे. आज सकाळी पहिला समाना पाचव्या क्रमांकासाठी झाला. मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज यांच्यात सामना झाला. दोन्ही संघाच्या मध्ये युवा कबड्डी सिरीज मध्ये दोन सामने झाले होते त्यापैकी 1 सामना मुंबई शहर व 1 सामना ठाणे संघाने जिंकला आहे. सामन्याची सुरुवात अंत्यत संथ झाली होती. पहिल्या आठ मिनिटांत 5-5 असा बरोबरीत सामना सुरू होता. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील तर ठाणे कडून कौस्तुभ शिंदे चढाईत चपळाई गुण मिळवत होते.
मध्यंतराला ठाण्याकडे 13-12 अशी नाममात्र 1 गुणांची आघाडी होती. मध्यांतरा नंतर ठाणे आक्रमक खेळ करत 19-14 अशी आघाडी वाढवली होती. शेवटची सात मिनिटं शिल्लक असताना 24-18 अशी ठाणे संघाकडे आघाडी होती. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना ठाणे संघाने मुंबई शहर ला ऑल आऊट करत सामन्यात निर्यायक आघाडी मिळवली. दोन्ही संघाकडून सांघिक खेळ बघायला मिळाला मात्र ठाणेचे खेळाडू सरस ठरले.
ठाणे हम्पी हिरोज संघाने 34-26 असा विजय मिळवत पाचवा क्रमांकाचा 1,00,000 रुपयाचा पारितोषिक पटकावला. तर मुंबई शहर संघाल सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुंबई शहर ने 50,000 रुपयाचा पारितोषिक पटकावले. ठाणे संघाकडून कौस्तुभ शिंदे ने 7 गुण मिळवले तर विघ्नेश चौधरी व चिन्मय गुरव ने 6 गुण मिळवले. यश भोईर ने 5 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने 6 गुण मिळवले. रुपेश साळुंखे ने 3 पकडी केल्या. (KMP Yuva Kabaddi Series – Thane Hampi Heroes team finished fifth)
बेस्ट रेडर- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर- यश भोईर, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023: 1000 व्या आयपीएल सामन्यात राजस्थानने जिंकला टॉस, यजमान मुंबई करणार प्रथम गोलंदाजी
चेपॉकवर चेन्नई पुन्हा चीत! अखेरच्या चेंडूवर पंजाबने पार केले 201 धावांचे आव्हान