जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे रंगणार आहे. यावर्षी ८ नव्हे तर दहा संघ या लिलावात आपली संघबांधणी करतील. लिलावात सर्वात महागडा कोणता खेळाडू ठरणार याविषयी चाहते अंदाज वर्तवत आहेत. मात्र, हा लिलाव पार पाडणारे ऑक्शनर ह्युज एडमिड्स (Auctioneer Huge Edmeades) नक्की आहेत तरी कोण? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
कोण आहेत एडमिड्स
आयपीएल लिलावाची जबाबदारी खऱ्या अर्थाने ऑक्शनरवर असते. यामध्ये काही गफलत झाल्यास याचा तोटा सरळ संघांना भोगावा लागतो. त्याचसाठी बीसीसीआय जागतिक कीर्तीचे ऑक्शनर बोलावत असते. २००८ ते २०१७ या कालावधीत जगप्रसिद्ध ऑक्शनर रिचर्ड मेडली यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर २०१८ पासून आतापर्यंत ह्युज एडमिड्स हे काम पाहत आहेत.
लिलाव क्षेत्रामध्ये एडमिड्स यांचे मोठे नाव आहे. इंग्लंडचे रहिवासी असलेल्या एडमिड्स यांनी अनेक प्रसिद्ध वस्तूंचा लिलाव केला असून, यामध्ये ललितकला, धर्मादाय व अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. एडमिड्स यांनी जगभरात आतापर्यंत २५०० पेक्षा लिलावात भाग घेतला असून, यामधून त्यांनी अब्जावधींच्या वस्तूंची विक्री केली आहे. धर्मादाय लिलावासाठी ते न्यूयॉर्क, टोकियो, माँट्रीयल, पॅरिस अशा जगभरातील विविध ठिकाणी जात असतात.
या गोष्टींचा केला लिलाव
एडमिड्स यांनी अनेक जगप्रसिद्ध पेंटिंगचा लिलाव केला आहे. यामध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ टेलर व राजकुमारी मार्गरट यांच्या पेंटिंगचा समावेश होता. या लिलावाला इंग्लंडमध्ये मोठा मान असतो. याव्यतिरिक्त जेम्स बॉण्ड व ब्रेकफास्ट विथ टिफनी या प्रसिद्ध चित्रपटांतील वस्तूंचाही त्यांनी लिलाव केला आहे. यासोबत ते युवा ऑक्शनरसाठी कार्यशाळा देखील घेत असतात.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: दिलदार कोहली! हुड्डाने विकेटचे खातं उघडताच विराटने दिली जादूची झप्पी
बीसीसीआयमध्ये पुन्हा भूकंप! महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने दिला राजीनामा; सविस्तर वाचा
सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल