---Advertisement---

असा पराक्रम करणारा किंग कोहली एकटाच!

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 7:13 PM
---Advertisement---

पुणे। शुक्रवारी(10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 78 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 17 चेंडूत 26 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यामुळे आता त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 250 चौकार पूर्ण झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 250 चौकार मारणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आलेला नव्हता.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत विराट पाठोपाठ भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहितने 234 चौकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक चौकार करणारे क्रिकेटपटू –

250 – विराट कोहली

234 – रोहित शर्मा

233 – पॉल स्टर्लिंग

223 – तिलत्करने दिल्शान

218 – मोहम्मद शेहजाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---