आयपीएल २०२० चा २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने एक कारनामा केला आहे.
विराट आणि डिविलियर्सने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. यात डिविलियर्स (७३) आणि विराटने (२२) धावा केल्या. यासह त्यांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक १० वेळा शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी रचत असा विक्रम करणारी त्यांची पहिलीच जोडी ठरली आहे. यामध्ये त्यांनी विराट कोहली- ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
यापूर्वी विराट-गेलने ९ वेळा, धवन- वॉर्नरने ६ वेळा, बेयरस्टो- वॉर्नर आणि गंभीर- उथप्पा यांनी ५ वेळा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी रचली आहे.
विराट आणि डिविलियर्सच्या शतकी भागीदारीमुळे बेंगलोर संघाने निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या. आणि कोलकाताला १९५ धावांचे आव्हान दिले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी
१० वेळा- विराट कोहली आणि एबी डिविलियर्स
९ वेळा- विराट कोहली आणि ख्रिस गेल
६ वेळा- शिखर धवन आणि डेविड वॉर्नर
५ वेळा- जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नर
५ वेळा- गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा