सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
या मालिकेत भारताने अॅडलेड येथे झालेला पहिला सामना आणि मेलबर्नला झालेला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पराभव पत्करला होता. पण चौथा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका आपल्या नावावर केली आणि पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला.
या मालिका विजयानंतर आज भारतीय संघाने मैदानात येऊन जोरदार जल्लोष केला आहे. या जल्लोषादरम्यान भारतीय संघातील केएल राहुल, कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी चेतेश्वर पुजारालाही नाचायला लावले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The celebrations begin for @imVKohli and @BCCI!#AUSvIND pic.twitter.com/kCFR6H8v1j
— 7Cricket (@7Cricket) January 7, 2019
पुजारा या मालिकेत मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. याबरोबरच तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवणारा एकूण पाचवाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार के. श्रीकांत, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मिळाला आहे.
पुजाराने या मालिकेत 4 सामन्यात 1258 चेंडू खेळताना 521 धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल 1868 मिनिटे फलंदाजी केली आहे. या मालिकेत पुजाराने 3 शतके आणि एक अर्धशतक केले आहे.
विशेष म्हणजे पुजाराचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच मालिकावीर पुरस्कार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–सौरव गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही किंग कोहलीने केली बरोबरी
–९ पैकी ८ संघाविरुद्ध विदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत भारताने मिळवला आहे विजय…
–या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…