जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळला जाणार आहे. ह्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार सराव केला आहे. त्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघांतील खेळाडूंविषयी अनेक मते मांडली जात आहेत. या अंतिम सामन्याकरिता भारतीय संघात अंतिम एकादशमध्ये कोणाला संधी मिळेल याबद्दल अनेक विश्लेषकानी आपली मतं मांडली आहेत. खासकरून मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा या दोघांमध्ये कोणाला संधी मिळते यावरून चर्चा चालू आहेत.
अशातच, कर्णधार कोहलीने मोहम्मद सिराज आणि इशांत शर्माचा एक फोटो शेयर केला आहे. फोटोवरून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की या दोघांनाही अंतिम सामन्यात अंतिम एकादशमध्ये संधी मिळेल. तसेच यावेळी चाहत्यांनी मोहम्मद शमीला अंतिम ११ मधून बाहेर करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
भारतीय कर्णधाराने मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मासोबत फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे वेगवान गोलंदाज दररोज आपले वर्चस्व गाजवत असतात.’ या फोटोत सिराज आणि इशांत व्यतिरिक्त मोहम्मद शमीदेखील थोडा दूर बसलेला दिसून येत आहे.
These quicks are dominating everyday 👍🇮🇳 @mdsirajofficial @ImIshant pic.twitter.com/anUrYhgaRu
— Virat Kohli (@imVkohli) June 14, 2021
काहीदिवसांपूर्वी विराट कोहली आणि रवि शास्त्री यांचे पत्रकार परिषदेपूर्वीचे एका संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते सिराजबद्दल चर्चा करत होते. त्यावरुन अनेकांनी अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात सिराजला संधी मिळेल असा कयास लावला होता. तेव्हापासून सिराज की इशांत, या चर्चेला जोर मिळाला आहे. आता हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणाला संधी मिळते.
सध्या भारतीय संघ आपापसात सराव सामना खेळत आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा, रिषभ पंत, केएल राहुल, इशांत शर्मा आणि रोहित शर्माने शानदार कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रेसलर जॉन सीना आहे विराट कोहलीचा चाहता? ‘ती’ पोस्ट पाहून चाहते पडले गोंधळात
अरर! भारत-न्यूझीलंडसमोर मोठा प्रश्न, कसोटी चॅम्पियनशीप फायनल सामन्यात येणार ‘हा’ मोठा व्यत्यय?