श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज माहेला जयवर्धनेने विराट कोहली, एमएस धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमधील महान खेळाडूबद्दल भाष्य केलं आहे. गेले अनेक वर्ष चाहत्यांमधील ही चर्चा सुरु सुरु ठेवण्यासाठी जयवर्धनेने काळजी घेतल्याचे दिसतंय.
विराटने आजपर्यंत टीम इंडियाची ज्या प्रकारे बांधणी केली आहे त्यासाठी जयवर्धनेने विराटचे अनेक वेळा कौतूक केले आहे तर तो सचिनचा नेहमीच आदर करत आला आहे.
“विराटकडे क्रिकेट खेळण्याची जबरदस्त क्षमताच नाही तर दबावात मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेर कशी कामगिरी करावी हे त्याला नक्की माहित आहे. त्याच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे असते.” असे कौतूक जयवर्धनेने कर्णधार कोहलीचे केले.
“ दुसऱ्या बाजूला आपण सचिनचा खेळ पाहतच मोठे झालो आहोत. आणि सचिनबद्दल देखील विराटप्रमाणेच अपेक्षांचे ओझे होते. आता ही जबाबदारी विराटच्या खांद्यावर आहे. यापुर्वी एमएस धोनीने ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.“
“विराटकडे जबरदस्त खेळाडूंचा संघ आहे. तसेच चाहते सतत विराटकडून जिंकण्याची अपेक्षा करत असतात. विराटने हे वातावरण तयार केले आहे. कर्णधार असणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. तो मैदानावर असताना फलंदाजी करतानाही मोठा दबाव असतो. याच गोष्टीतून एखाद्या खेळाडूचे महानत्व कळते. आणि विराटने यातूनच स्वत:ला सिद्ध केले आहे. ” असेही जयवर्धने यावेळी म्हणाला.
विशेष म्हणजे यातील तिनही खेळाडूंनी ५० षटकांचा विश्वचषक जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने
–असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ
–हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?
–भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा