साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.
या मालिकेत विराट कोहलीला विक्रमांचा विक्रम करण्याची संधी आहे. इंग्लंड दौऱ्यात एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची मोठी संधी विराटला चालुन आली आहे.
सुनिल गावसकर यांनी एकाच मालिकेत इंग्लंडमध्ये ६०२ तर राहुल द्रविडने ५४२ धावा केल्या होत्या. सध्या विराट कोहलीने तीन सामन्यांत ४४० धावा केल्या असुन दोन सामने बाकी आहेत.
विराट हा विक्रम मोडेल असे मत भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही व्यक्त केले आहे. तसेच हा विक्रम मोडला तर द्रविड आणि गावसकर नक्कीच आनंदी होतील असेही तो म्हणाला आहे. माझ्या विक्रमाची (त्रिशतकाची) जेव्हा करुण नायर बरोबरी केली होती तेव्हा मला जसा आनंद झाला होता तसाच काहीसा आनंद गावसकर आणि द्रविडला होईल असेही तो पुढे म्हणाला,
सध्या भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन (५१). द्रविड (३६) आणि गावसकर (३४) यांच्यापाठोपाठ विराट सेहवागसह चौथ्या स्थानी आहे.
सेहवागने १०४ कसोटीत २३ तर विराटने ६९ कसोटीत २३ शतके केली आहेत.
थोडसं खास-
जेव्हा १९३०मध्ये आॅस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर आली होती तेव्हा सर डाॅन ब्रॅडमन यांनी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ७ डावात फलंदाजी करताना ९७४ धावा केल्या होत्या. कोणत्याही कसोटी मालिकेत, कोणत्याही देशात केलेल्या या सर्वोच्च धावा आहे.
एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताकडून सुनिल गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी १९७०-७१ला विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये ४ कसोटीत ८ डावात फलंदाजी करताना ७७४ धावा केल्या होत्या. तसेच गावसकरांनी १९७८-७९मध्ये भारतात विंडीजविरुद्ध ६ सामन्यात ७३२ धावा केल्या होत्या तर विराटने बाॅर्डर -गावसकर मालिकेत आॅस्ट्रेलियात ४ सामन्यात ८ डावात फलंदाजी करताना ६९२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक
-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी