सोमवारी (दि. ०९ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५६वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळला गेलेला हा सामना कोलकाताने ५२ धावांनी जिंकला. हा त्यांचा हंगामातील पाचवा विजय होता. कोलकाताच्या या विजयाचा हिरो पॅट कमिन्स ठरला. सामना जरी कोलकाताने जिंकला असला, तरीही मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या शानदार प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. मात्र, कोलकाताच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव ११३ धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे कोलकाताला हा सामना ५२ धावांनी जिंकण्यात यश आले.
A top team effort! 👏#AmiKKR #MIvKKR #IPL2022 pic.twitter.com/5xWT65YuSB
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 9, 2022
मुंबईकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४३ चेंडूत ५१ धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकारही मारले होते. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात फक्त २ धावांवर बाद झाला.
That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
Scorecard – https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट्स आपल्या खिशात घातल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेलनेही उत्तम गोलंदाजी केली. त्याने २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, वरुण चक्रवर्ती आणि टीम साऊदी यांनीही प्रत्येकी विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाकडून वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी जोरदार फटकेबाजी केली. वेंकटेशने २४ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या, तर राणानेही २६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणेने २५ आणि रिंकू सिंगने २३ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यरला फक्त ६ धावा करता आल्या. खालच्या फळीतील ३ फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने चकित करणारी कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १ निर्धाव षटक टाकत १० धावा दिल्या आणि सर्वाधिक ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कुमार कार्तिकेय याने २ विकेट्स घेतल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या विजयासह कोलकाताला गुणतालिकेत फायदा झाला. ते सातव्या स्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे, नवव्या पराभवासह मुंबई पुन्हा तळाशी कायम राहिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! जसप्रीत बुमराहने केली करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी; इशांत अन् मलिंगालाही पछाडलं
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण