इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४७वा सामना सोमवारी (दि. २ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात कोलकाता संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा कोलकाताचा चौथा विजय होता. या विजयात नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी मोलाचा वाटा उचलला. रिंकून षटकार मारत सामना जिंकवला. त्याने या सामन्यात कोलकाताकडून सर्वाधिक धावा केल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना राजस्थानने ५ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने ७ विकेट्सने सामना खिशात घातला.
Nitish Rana with a maximum to finish it off as @KKRiders win by 7 wickets and add two much needed points to their tally.
Scorecard – https://t.co/fVVHGJTNYn #KKRvRR #TATAIPL pic.twitter.com/cEgI86p4Gn
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2022
कोलकाताकडून फलंदाजी करताना नितीश राणाने (Nitish Rana) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. यामध्ये २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. तसेच, रिंकू सिंगने (Rinku Singh) २३ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने १ षटकार आणि ६ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार श्रेयस अय्यरने ३४ आणि बाबा इंद्रजितने १५ धावा चोपल्या. ऍरॉन फिंचला मोठी खेळी करता आली नाही. तो ४ धावा करून बाद झाला.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत ५४ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त शिमरॉन हेटमायरने २७ आणि जोस बटलरने २२ धावा केल्या. तसेच, इतर कोणत्याही फलंदाजांना २०हून अधिक धावा करता आल्या नाहीत. रियान परागने १९, करुण नायरने १३ आणि देवदत्त पडिक्कलने २ धावांचे योगदान दिले.
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना टीम साऊदीने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त उमेश यादव, अनुकूल रॉय आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सलग ५ पराभवानंतर कोलकाताने शानदार विजय मिळवला. या विजयासह कोलकाताला गुणतालिकेत फायदा झाला. त्यांनी सातव्या स्थानी झेप घेतली आहे, तर राजस्थान तिसऱ्या स्थानी कायम आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! खराब फॉर्ममुळे वेंकटेश अय्यरची हाकालपट्टी; प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळाले स्थान
कोलकाताविरुद्ध बटलरने केल्या फक्त २२ धावा, तरीही मोडला ‘किंग कोहली’चा भलामोठा विक्रम; टाका एक नजर
उमरानच्या सुपरफास्ट चेंडूवर ऋतुराजचा ‘लय भारी’ षटकार; गोलंदाजाची रिऍक्शन पाहण्यासारखी