---Advertisement---

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल

---Advertisement---

सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात आला. बेंगलोर संघाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

या सामन्यादरम्यान सर्वांना चकित करण्याजोगी एक गोष्ट पाहायला मिळाली. झाले असे की, मुंबई संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेला देवदत्त पड्डीकल (४० चेंडू ५४ धावा) आणि ऍरॉन फिंच (३५ चेंडू ५२) यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी रचली. पण पुढे डावातील नवव्या षटकात ट्रेंट बोल्टने कायरन पोलार्डच्या हातून फिंचला झेलबाद केले.

त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. अशात संघाला पहिली विकेट मिळाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने डावातील १०वे षटक टाकण्यासाठी अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याला पाठवले. त्यावेळी पंड्याने ज्या शैलीत गोलंदाजी केली, त्यावरुन सर्वांना केदार जाधवच्या गोलंदाजी शैलीची आठवण झाली.

त्यानंतर क्रुणालच्या या गोलंदाजी शैलीचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मिडीयावर शेअर केला आणि लिहिले की, “क्रुणाल पंड्या केदार जाधवच्या गोलंदाजी शैलीचे अनुकरण करत आहे. पण असे करण्याची परवानगी आहे का???”  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रणामात व्हायरल होत होता. परंतु काही काळानंतर त्या चाहत्याने तो व्हिडिओ डेलेट केला.

https://twitter.com/wtfneel/status/1310591850709831686?s=20

https://twitter.com/iAkhil25i/status/1310591976153255937?s=20

या ट्विटला वेगवेगळ्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की, ‘क्रुणालमध्ये केदार जाधव घुसला आहे.’ तर काहींनी ‘क्रुणाल पूर्णपणे विसरला की तो गोलंदाजी करतोय आणि तो चक्क मैदानावर लगोरी खेळायला लागला,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या

…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीचे संकट वाढले, ‘हा’ क्रिकेटपटू तीन सामन्यातून बाहेर?

ट्रेंडिंग लेख-

परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी

IPL २०२०: ‘हे’ ५ धडाकेबाज फलंदाज करू शकतात ५०० पेक्षा जास्त धावा

जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---