IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या 17व्या हंगामासाठीचा लिलाव दुबईत सुरू आहे. या लिलावात एकापेक्षा एक अशा 333 खेळाडूंचा समावेश आहे. यातील काही खेळाडूंवर विक्रमी बोली लागली, तर काहींना अनसोल्ड राहावे लागले. तसेच, असेही काही खेळाडू होते, ज्यांना फ्रँचायझींनी बेस प्राईजमध्ये ताफ्यात घेतले. बेस प्राईजमध्ये विकला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याचाही समावेश होता. भरतला कोलकाता नाईट रायडर्स संघाने बेस प्राईजमध्ये विकत घेतले.
केएस भरत बेस प्राईजमध्ये केकेआरच्या ताफ्यात
यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) या लिलावात 50 लाखांच्या बेस प्राईजमध्ये (KS Bharat 50 Lakh Base Price) उतरला होता. यावेळी त्याच्यावर अनेक संघ बोली लावतील, अशी चर्चा होती. मात्र, केकेआर (KKR) सोडला, तर इतर कोणत्याही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही.
भरतचा आयपीएल अनुभव
केएस भरत याला आयपीएलचा फार अनुभव नाहीये. त्याने आतापर्यंत फक्त 10 सामने खेळले आहेत. त्याला आयपीएल 2021 हंगामात आरसीबी संघाने 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये ताफ्यात घेतले होते. पहिल्याच हंगामात त्याने 8 सामन्यात 38.20च्या सरासरीने 191 धावा केल्या होत्या. यामध्ये 1 अर्धशतकाचा समावेश होता. मात्र, आयपीएल 2022 हंगामात त्याला फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याला फक्त 8 धावा करता आल्या होत्या. (KS Bharat sold to KKR for INR 50 lakhs in ipl 2024 auction)
हेही वाचा-
IPL 2024 Auction: चेन्नईने दाखवला न्यूझीलंडच्या फलंदाजावर विश्वास, एकट्यावर केले तब्बल ‘एवढे’ कोटी खर्च
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास