सध्या क्रिकेट विश्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल चर्चा होत आहे. या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांनी स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची(आयसीसी) असल्यामुळे या स्पर्धेला जगातील लाखो चाहत्यांचा पाठींबा आहे. आयसीसीची ही स्पर्धा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना ओढ लागेल ती म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेची. टी२० विश्वचषक स्पर्धेची जितकी ओढ चाहत्यांना आहे तितकीच ओढ खेळाडूंनासुद्धा आहे.
भारतीय संघाचा ‘चायनामन’ गोलंदाज म्हणेजे कुलदीप यादव गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी करताना संघर्ष करत आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान टीकवण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. पण असे असले तरी कुलदीपला विश्वास आहे की येत्या टी२० विश्वचषकासाठी तो भारतीय संघात स्थान बनवण्यात यशस्वी होईल.
कुलदीप यादवचे म्हणणे आहे की, “खरे सांगू तर निराश होणे हा बरोबर शब्द नाही आहे, एका खेळाडूला दु:खी होण्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे तुम्हाला मैदानात जाऊन प्रदर्शन करायचे असते, सामना खेळायचा असतो. व्यक्तिगत रुपात आपण असा विचार करू शकतो परंतु, क्रिकेटसोबत नाही. क्रिकेट एक सांघिक खेळ आहे आणि त्यात आपल्याला संघाच्या गरजे नुसार खेळावं लागतं. संघ आणि संघ नियोजनाबद्दल खूप विचार करवा लागतो म्हणून या गोष्टीवर सकारात्मक विचार केलेला बरा. सतत मेहनत करत राहा आणि संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्या. मला आजवर भारतीय संघाने नेहमीच पाठींबा दिला आहे.”
कुलदीप सांगतो की, “टी-२० क्रिकेटमध्ये जर संघात स्थान कायम करून ठेवायचे असल्यास तुम्हाला प्रदर्शन करणे हाच एकमेव मार्ग आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर आईपीएल माझ्यासाठी महत्वाचा मार्ग असणार आहे. मला विश्वास आहे की, संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी मी चांगली मेहनत घेईन. श्रीलंक दौऱ्यावर आणि आयपीएलमध्ये मी चांगले प्रदर्शन केले तर, मला खात्री आहे मी येत्या टी२० विश्वचषकात असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी विशेषज्ञ मार्नस लॅब्यूशेनची टी२० स्पर्धेत कमाल; मिळू शकते आयपीएल अन् विश्वचषकात संधी
टेस्ट चँपियनशीपचा अंतिम सामना ज्या मैदानावर होतोय, त्यावरचे दोन मुंबईकरांचे विक्रम आहेत जबरदस्त
टीम इंडियाची विश्व कसोटी स्पर्धेपुर्वीच डोकेदुखी वाढली, ‘हा’ खेळाडू आलाय जबरदस्त फॉर्मात