इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मधून बाहेर पडलेल्या कुलदीप यादवच्या उजव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आता त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी त्याला बराच काळ आराम करावा लागेल. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा कुलदीप यादव बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर राहिला आहे.
चायनामन गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा कुलदीप यादवच्या गुडघ्यावर बुधवारी(२९ सप्टेंबर) शस्त्रक्रिया झाली आहे. आयपीएल २०२१ च्या दरम्यान तो यूएईहून भारतात परतला होता. त्याने शस्त्रक्रियेनंतरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे.
डाव्या हाताचा मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. कुलदीप यादवने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला आहे. यासोबत तो थम्स अपही करत आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला पूर्णपणे ‘पट्टी’ केल्याचे फोटोत स्पष्ट दिसत आहे.
कुलदीपने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि लवकर बरे होण्याच्या मार्गाचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. आपल्या सहकार्यासाठी सर्वांचे खूप आभार. आता मी लवकर बरा होऊन मैदानावर येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सराव सुरू करणार आहे.’
Surgery was a success and the road to recovery has just begun. Thank you so much to everyone for your amazing support. The focus is now to complete my rehab well and be back on the pitch doing what I love as soon as possible. ♥️???????? pic.twitter.com/364k9WWDb3
— Kuldeep yadav (@imkuldeep18) September 29, 2021
कानपूरच्या कुलदीपने भारतासाठी ७ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामन्यांमध्ये एकूण १७४ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंका दौऱ्यावर शेवटच्या वेळी तो भारताकडून खेळला होता, त्याने एकदिवसीय सामन्यात ४८ धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या आणि टी -२० सामन्यांमध्ये ३० धावां देऊन दोन बळी घेतले होते. त्याच मालिकेच्या दुसऱ्या एका एकदिवसीय आणि टी २० सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
एकही सामना न खेळता ‘ज्युनिअर तेंडुलकर’ आयपीएलमधून आऊट; या गोलंदाजाला मिळाली जागा
भारतीय महिला ऐतिहासिक ‘पिंक बॉल टेस्ट’साठी सज्ज, दीड दशकानंतर खेळणार ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी
भारताला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीतून प्रमुख खेळाडू बाहेर






