भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामासाठीही त्याला कोलकाता संघाने कायम केले आहे. कुलदीपने कोलकाता संघाचा त्याच्या कारकिर्दीत मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने कोलकाताचा माजी कर्णधार आणि सध्याचा पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरचे कौतुक केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कुलदीपने म्हटले आहे की ‘मी २०१४ साली १९ वर्षांखालील विश्वचषकात एक वरिष्ठ खेळाडू होतो आणि मी अपेक्षित कामगिरी करण्यात यशस्वी झालो होतो. त्यानंतर कोलकाता संघाने मला निवडले आणि माझे आयुष्य अचानक बदलले.’
कुलदीप म्हणाला, ‘मला कोलकाता संघात खुप वेळ मिळाला. संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते, विशेषत: गौतम गंभीर. मी त्याचे नेहमीच आभार मानेल. त्याने एक कर्णधार म्हणून मला मार्गदर्शन केले आणि मला सर्वकाही शिकवले. त्याने मला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आधीही सल्ला दिला होता की गोलंदाजी कशी करावी, आपली शैली कशी सुधारावी आणि एक आत्मविश्वासपूर्ण खेळाडू कसे बनायला हवे.’
गौतम गंभीरने कोलकाताचे २०१७ पर्यंत नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेेतेपद मिळवले आहे.
कुलदीप पुढे म्हणाला, ‘कोलकातामध्ये माझ्या पहिल्या हंगामात मी एक युवा खेळाडू होतो आणि संघात सुनील नारायण, पीयूष चावला आणि काही दिग्गज फिरकीपटू होते. मी नेहमी विचार करायचो की माझ्यासाठी ही शिकण्याची आणि पुढे जाण्याची चांगली संधी आहे. कोलकाता नेहमीच युवा खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. त्यांनी नेहमीच माझी काळजी घेतली आहे.’
कुलदीपने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २०१६ सालापासून ४५ सामने खेळले असून त्याने ३०.९० च्या सरासरीने ४० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: गोलंदाजाने टाकलेला चेंडू हवेतून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, बॉलिंग पाहून फलंदाजही अवाक्
विराट-अनुष्काच्या लाडक्या लेकीचे नाव ठरलं! बाळासह फोटो पोस्ट करत दिली माहिती
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३६ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम