वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार सांघिक खेळाचा नजराणा पेश केला. फलंदाजांनी केवळ 230 धावांचे लक्ष ठेवलेले असतानाही सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला 100 धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात कुलदीप यादव याने जोस बटलर याला बाद केलेल्या चेंडूची चांगलीच चर्चा रंगली आहे.
विजयासाठी केवळ 230 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे पहिले चार फलंदाज पहिल्या दहा षटकात केवळ 40 धावा जोडून बाद झाले. त्यानंतर जोस बटलर व मोईन अली यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीपने ही भागीदारी फोडली. इंग्लंडच्या डावातील 16 व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीपने पहिल्याच चेंडूवर बटलरचा त्रिफळा उडवला. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या या चेंडूने तब्बल 7.2 अंश इतके जबरदस्त वळण घेत मधल्या स्टंपचा वेध घेतला. हा स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, त्या आधीच्या षटकात कुलदीप सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना एका चाहत्याने “बटलर बहोत मार रहा है” असे म्हटल्यानंतर कुलदीप याने हाताने इशारा करत “में हू ना” असे म्हटले. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने बटलरला तंबूचा रस्ता दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
(Kuldeep Yadav Said Im There And Took Jos Buttler Wicket Videos Goes Viral)
महत्वाच्या बातम्या –
शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद