मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात बुधवारी (२० एप्रिल) ३२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून पराभूत केले. दिल्लीच्या विजयात अनेक अनुभवी खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. त्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याचाही समावेश आहे. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. पण कुलदीपने यावेळी खिलाडूवृत्ती दाखवत त्याचा पुरस्कार अक्षर पटेलबरोबर शेअर केला.
या सामन्यात कुलदीप (Kuldeep Yadav) आणि अक्षर (Axar Patel) या दोघांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. कुलदीपने २४ धावा देत कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस यांना त्रिफळाचीत केले. त्याचबरोबर अक्षरने १० धावा देत लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे या दोघांचीही गोलंदाजी पंजाबला २० षटकांत सर्वबाद ११५ धावांवर रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली.
सामनावीराचा (Man Of The Match) पुरस्कार स्विकारताना कुलदीप म्हणाला, ‘मी हा पुरस्कार अक्षरबरोबर शेअर करू इच्छितो. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि मधल्या षटकांमध्ये महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मी कागिसो रबाडाबरोबर खूप खेळलो आहे. त्यामुळे मला माहित आहेस त्याचे पाय फार हलत नाहीत. माझी योजना चायनामन आणि गुगली गोलंदाजी करण्याचा होता.’
तो पुढे म्हणाला, ‘माझ्या दुसऱ्या विकेटचे श्रेय रिषभ पंतला जाते. त्याने राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सांगितले होते. खरंच सांगतो, मला माहित आहे, माझी भूमिका काय आहे. मी फक्त माझी लाईन आणि लेंथवर लक्ष्य केंद्रीत करतो. मी खूप काळानंतर माझ्या गोलंदाजीची मजा घेत आहे. याचे श्रेय रिषभ पंतला जाते, त्याने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे तुमचा विश्वास वाढतो. आमच्यासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे.’
A touch of class from @imkuldeep18! 👍 👍#TATAIPL | #DCvPBKS | @akshar2026 pic.twitter.com/tgF3M4wOYo
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
दिल्लीचा तिसरा विजय
या सामन्यात दिल्लीच्या (DC vs PBKS) गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे पंजाबला २० षटकांत सर्वबाद ११५ धावाच करता आल्या होत्या. त्याच्याकडून जितेश शर्माने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्यानंतर ११६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीने केवळ पृथ्वी शॉ याची ४१ धावांवर विकेट गमावली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने नाबाद ६० धावा केल्या, तर सर्फराज खान १२ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे १०.३ षटकांत दिल्लीने ११६ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे
पावरप्लेमधील धमाक्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा खास विक्रम, गुणतालिकेतही घेतली भरारी
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी बूम बूम बुमराहने गाळला घाम; ट्रेनिंगदरम्यानचा खास व्हिडिओ व्हायरल