टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे काही खेळाडू अजूनही सुट्यांचा आनंद घेत आहेत. तर काही खेळाडू 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा एक खेळाडू बागेश्वर बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून फिरकीपटू कुलदीप यादव आहे.
कुलदीप यादवनं यापूर्वीही बागेश्वर बाबांची भेट घेतली आहे. त्यावेळी सोशल मीडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडिओची भरपूर चर्चा झाली होती. आता तो पुन्हा एकदा बागेश्वर बाबांच्या भेटीसाठी गेल्याचं पाहायला मिळालं.
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा कुलदीप यादव बाबा बागेश्वरचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला याबाबतची माहिती बागेश्वर धामनं सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी कुलदीपचा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादव बागेश्वर धाम सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात पोहोचला.”
Kuldeep Yadav reached Bageshwar Dham & took blessings of bagheshwar Dham Sarkar on the Eve of Guru Purnima Mahotsav. 🙏 pic.twitter.com/dOzNtDjAEf
— Johns. (@CricCrazyJohns) July 23, 2024
विशेष म्हणजे, भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वीही कुलदीप यादव बागेश्वर बाबांची भेट घेण्यासाठी बागेश्वर धाम येथे आला होता. त्यावेळीही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होते. एकदिवसीय विश्वचषकातही कुलदीपनं चेंडूनं चमकदार कामगिरी केली होती. आता तो 2 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे.
कुलदीप यादवनं नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली होती. विश्वचषकात त्यानं 5 सामन्यात 13.90 ची सरासरी आणि 6.95 च्या इकॉनॉमी रेटनं 10 विकेट घेतल्या. मात्र, अंतिम सामन्यात त्याची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्याच्या चेंडूंवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर धावा कुटल्या होत्या. कुलदीपनं फायनलमध्ये आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता 45 धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘किंग’ कोहलीनं क्रिकेटवर गाजवलंय वर्चस्व..! पण त्याची दहावीची मार्कशीट पाहून बसेल धक्का
बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात