बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. यावेळी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने बांगलादेशच्या पहिल्या डावामध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 4 आणि तिसऱ्या दिवशी 1 विकेट घेतली. यामुळे त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यानंतर त्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले दोन वर्षानंतर खेळत आहे, असे वाटत नाही.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने त्याच्या कामगिरीबाबत म्हटले, “इतक्या मोठ्या काळानंतर खेळण्याचा विचार केला नव्हता. संघाचा भाग नसणे आणि कोणत्यात प्रकारामध्ये न खेळणे हे पूर्णपणे वेगळे असते. कारण जेव्हा आपण एखाद्या प्रकारात खेळतो तेव्हा तुमच्यावर अधिक दबाव येत नाही. मलाही तसेच काहीसे जाणवले, कारण मी संघाचा भाग होतो. जवळपास दोन वर्षानंतर खेळत होतो, असे मला वाटलेच नाही. ”
कुलदीपने 2017मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्याने बांगलादेशच्या आधी शेवटचा कसोटी सामना 2021च्या फेब्रुवारी महिन्यात खेळला होता.
कुलदीप पुढे म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये अधिक नियंत्रणाची आवश्यकता असते, तर वनडेमध्ये क्षेत्ररक्षण उत्तम असणे गरजेचे असते. तेथे फलंदाज वेगळ्याच मानसिक स्थितीत असतो. कसोटीमध्ये लवकरात लवकर विकेट्स घेण्याची आवश्यकता असते, कारण फलंदाजांकडे अधिक वेळ असतो. यामुळे गोलंदाजांना लागोपाठ एकाच ठिकाणी चेंडू टाकावा लागतो.”
बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीपने मुशफिकुर रहिम, शाकिब अल हसन, विकेटकीपर नुरूल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन यांच्या विकेट्स घेतल्या. त्याने 16 षटके टाकताना 40 धावा देत या विकेट्स घेतल्या. जी त्याची कसोटीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली आहे. त्याचबरोबर त्याने भारताच्या पहिल्या डावात 114 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 40 धावाही केल्या.
Third five-wicket haul for Kuldeep Yadav in Tests 👏#BANvIND | #WTC23 | 📝 https://t.co/ym1utFHoek pic.twitter.com/VFQ9ugi3s7
— ICC (@ICC) December 16, 2022
कुलदीपच्या जबरदस्त गोलंदाजीने बांगलादेशचा पहिला डाव 150 धावसंख्येवरच संपुष्टात आला. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी केली. गिलचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक होते. त्याने 110 धावा केल्या. पुजारा 102 धावा करत नाबाद राहिला. सामना जिंकण्यासाठी बांगलादेशसमोर 513 धावांचे आव्हान आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणाच्या शोधात; एफसी गोवाला देणार आव्हान
89 वर्षांपूर्वी आजच लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण