आयपीएल २०२० चा ३१ वा सामना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना पंजाब संघाने ८ विकेट्सने जिंकला. या हंगामातील हा पंजाबचा दुसराच विजय होता.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३१ सामने झाले आहेत. यानंतर आता कोणता संघ स्पर्धेत पुढे जाणार कोणता बाहेर पडणार याचे चित्र हळू हळू स्पष्ट व्हायला सुरुवात होईल.
या आयपीएल२०२० मधील ३१ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल-
१- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ८, विजय ६, पराभव २, गुण १२, नेट रन रेट +०.९९०)
२- मुंबई इंडियन्स: (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.३२७)
३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ८, विजय ५, पराभव ३, गुण १०, नेट रन रेट -०.१३९)
४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ७, विजय ४, पराभव ३, गुण ८, नेट रन रेट -०.५७७)
५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट +०.००९)
६- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट -०.३९०)
७- राजस्थान रॉयल्स : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट -०.८४४)
८- किंग्स XI पंजाब : (सामने ८, विजय २, पराभव ६, गुण ४, नेट रन रेट -०.२९५)