रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या ३६ व्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेला हा सामना बरोबरीत सुटला होता. परंतु पंजाबने हा सामना दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबनेही २० षटकात ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा अंतिम निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २ बाद ५ धावा केल्या. पंजाबच्या या धावांचा पाठलाग करताना मुंबईनेही ५ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे दूसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यावेळी मुंबईने सुरुवातीला फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या फलंदाजांनी २ चौकार आणि एक षटकार लगावत सामना खिशात घातला.
मुंबईच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने केवळ ५१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची जबरदस्त खेळी केली. तसेच ख्रिस गेल आणि निकोलस पूरननेही प्रत्येकी २४ धावांचे योगदान दिले. तर ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिपक हुडाच्या १६ चेंडूतील नाबाद २३ धावांच्या खेळीमुळे पंजाब मुंबईच्या लक्ष्याची बरोबरी करु शकला.
मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटकात २४ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर राहुल चाहरनेही ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेलची महत्तपूर्ण विकेट घेतली.
तत्पुर्वी मुंबईकडून प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डनेही प्रत्येकी ३४ धावांची कामगिरी केली. या तिघांव्यतिरिक्त मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला जास्त धावा करता आल्या नाहीत.
पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगने मुंबईच्या २-२ फलंदाजांना तंबूत धाडल. तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोईनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सुपर’ थरार!! कोलकाताच्या फर्ग्युसनने हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
IPL: ‘मागील ३ सामन्यात…’, कोलकाताविरुद्ध सामना गमावल्यानंतर डेविड वॉर्नरचे मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष